महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 195 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 436 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 17 हजार 560 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.69 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 126 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 195 मृत्यूंची नोंद […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 436 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 17 हजार 560 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.69 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 126 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 195 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 87 लाख 44 हजार 201 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 27 हजार 194 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 4 लाख 47 हजार 681 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 72 हजार 810 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 126 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 27 हजार 127 इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चेन अंतर्गतचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मॉल, दुकानं, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं हे सगळं या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातल्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत म्हणून चिंता व्यक्त केली आहे. 11 जिल्ह्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध कायम राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये गरज पडल्यास निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तसंच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण वाढले आहेत. एवढंच नाही तर झिका व्हायरसचाही एक रूग्ण आढळला आहे. दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसते आहे तरीही राज्य सरकारने शिथील केले आहेत. मात्र कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे राज्य सरकारने बंधनकारक केलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम घालूनच हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
केरळमध्ये वाढणारे रूग्ण हा देखील देशासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. तिकडे तिसरी लाट आली आहे असं म्हणता येईल असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच केलं होतं. महाराष्ट्रही तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला सज्ज आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT