मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरवर फक्त 8 जणांनीच लावली बोली, दोन महिन्यात 1 कोटी लस पुरविण्याचा दावा
मुंबई: मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. पण यासाठी फक्त आठच जणांनी बोली लावल्या आहेत. या पुरवठादारांपैकी सात जण हे स्पुटनिक व्ही लस पुरविणार असल्याचं सांगत आहेत तर एक पुरवठादार फायझरची लस पुरविणार असल्याचं म्हणत आहे. या सर्व बोली कंपन्यांद्वारे नाहीत तर पुरवठाधारकांकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या मते 60 दिवसात […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. पण यासाठी फक्त आठच जणांनी बोली लावल्या आहेत. या पुरवठादारांपैकी सात जण हे स्पुटनिक व्ही लस पुरविणार असल्याचं सांगत आहेत तर एक पुरवठादार फायझरची लस पुरविणार असल्याचं म्हणत आहे. या सर्व बोली कंपन्यांद्वारे नाहीत तर पुरवठाधारकांकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या मते 60 दिवसात ते 1 कोटी लस पुरवू शकतात.
ADVERTISEMENT
लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई महापालिकेने 1 कोटी डोसेससाठी ग्लोबल टेंडर काढलेलं. ज्याला आता या लसींचे डील करणाऱ्या पुरवठादारांनी प्रतिसाद देत म्हटलंय की, जून अखेरपर्यंत मुंबई महापालिकेला लसी देता येतील.
मुंबई महापालिकेला किती लसी मिळणार?
हे वाचलं का?
1. मुंबई महापालिकेच्या टेंडरला 7 पुरवठादारांनी स्पुटनिक व्ही लस देता येईल असं सांगितले आहे.
2. एका पुरवठादाराने फायझर लस द्यायचं सांगितले आहे.
ADVERTISEMENT
3. 60 दिवसांमध्ये 1 कोटी डोस देण्याचं आश्वासन
ADVERTISEMENT
4. एका पुरवठादाराने जूनमध्येच पुरवठा देऊ असं म्हटलं आहे.
Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!
खरं तर पंजाब सरकारनेही ग्लोबल टेंडर काढलेले पण तेव्हा फायझरने सरळ म्हटलेलं की, आम्ही लसींचा पुरवठा थेट केंद्र सरकारलाच करणार, कोणत्याही स्थानिक किंवा राज्य सरकारशी करणार नाही.
पण बीएमसीच्या टेंडरबाबत कंपनीने पुरवठ्याचं आश्वासन दिलेलं असून, फायझर लस पुरविण्यार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अर्थात आताच्या घडीला टेंडरची प्रक्रिया प्राथमिक पातळीवरच सुरू आहे. अजूनही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे आणि म्हणूनच आलेल्या प्रस्तावांचं काय करायचं, त्यातले कोणते प्रस्ताव मान्य करायचे, याबाबत आता बीएमसीच्या टास्क फोर्सची बैठकही होणार आहे.
मुंबईत खासगी हॉस्पिटल सोसायट्यांमध्ये करणार लसीकरण
स्पुटनिक व्ही लसीबाबत जो काही डेटा उपलब्ध आहे, तो म्हणावा तितका विश्वासार्ह नाही, असं काही मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळेच स्पुटनिक व्हीच्या पुरवठादारांनी जरी लस पुरवणार असल्याचं सांगितलं असलं तरी ते स्वीकारावं का? याबाबत टास्क फोर्स निर्णय घेणार आहे.
जुलैपर्यंत मुंबईतल्या किमान 1 कोटी जनतेला तरी पूर्णपणे लसीचं कवच देण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष्य आहे. टार्गेट ठेवणं सोप्प आहे. पण लसीकरणाचा स्पीड आणि टार्गेट कितपत मेळ खाईल, हे ही पाहावं लागेल.
पाहा आतापर्यंत कोणत्या शहरात किती लसीकरण झालंय:
-
मुंबई – 30 लाख 58 हजार
-
पुणे – 26 लाख 70 हजार
-
नाशिक – 9 लाख 44 हजार
-
नागपूर – 12 लाख 58 हजार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT