Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या केसला वेगळं वळण; आधी खटला नंतर…

मुंबई तक

Nawazuddin Siddiqui case: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यातील संकट संपण्याचे नाव घेत नाहीये. अलीकडेच, सर्व आरोपांना कंटाळून, अभिनेत्याने त्याची घटस्फोटित पत्नी आलिया सिद्दीकी आणि त्याचा भाऊ शमसुद्दीन यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. त्याच वेळी, आता बातम्या येत आहेत की अभिनेत्याने त्याच्या घटस्फोटित पत्नी आणि भावाला न्यायालयाबाहेर सेटलमेंट ऑफर केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nawazuddin Siddiqui case: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यातील संकट संपण्याचे नाव घेत नाहीये. अलीकडेच, सर्व आरोपांना कंटाळून, अभिनेत्याने त्याची घटस्फोटित पत्नी आलिया सिद्दीकी आणि त्याचा भाऊ शमसुद्दीन यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. त्याच वेळी, आता बातम्या येत आहेत की अभिनेत्याने त्याच्या घटस्फोटित पत्नी आणि भावाला न्यायालयाबाहेर सेटलमेंट ऑफर केली आहे. (A different twist to Nawaz’s case; First defamation suit followed by settlement draft)

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनला सख्ख्या भावाने आईलाही भेटू दिलं नाही, कारण…

आलियाने हेतूवर प्रश्न उपस्थित केला

नवाजचे वकील सुनील कुमार यांनी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर मानहानीचा खटला दाखल केला होता आणि असा युक्तिवाद केला होता की अभिनेत्याचा भाऊ आणि माजी पत्नी या दोघांनीही नवाजची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही वक्तव्य सार्वजनिकपणे करू नये. यावर कायमस्वरूपी बंदी घालावी. या प्रकरणाची सुनावणी 30 मार्च रोजी होणार होती, मात्र त्याच दरम्यान आणखी एक घटना समोर आली आहे. असे कळते की अभिनेत्याने त्याच्या घटस्फोटित पत्नीला न्यायालयाबाहेर समझोता देऊ केला आहे.

बायकोला फक्तनवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा गौप्यस्फोट

हे वाचलं का?

    follow whatsapp