पतीपासून वेगळी झाली, शफीसोबत अफेअर; शेवटी मृतदेह तुकडे कालव्यात सापडले
Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यात VTPS कूलिंग कॅनालमध्ये कल्याणी ऊर्फ दुर्गाचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्यानंतर हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पैशांवरून मटण दुकानदार शफीसोबत झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीपासून वेगळी झाली, शफीसोबत अफेअर
शेवटी मृतदेह तुकडे कालव्यात सापडले
Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यात VTPS कॅनालमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडालीये. महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 18 सप्टेंबर 2026 रोजी इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनालमध्ये महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था पाहता सुरुवातीला तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानंतर बेपत्ता महिलांशी संबंधित प्रकरणांची माहिती तपासत पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिला गुंटूर जिल्ह्यातील मंगलागिरी येथील कल्याणी ऊर्फ दुर्गा असल्याचे समोर आले. ती पती आणि कुटुंबापासून वेगळी राहत होती आणि एकटीच राहत होती.
हेही वाचा : "ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप
पैशांवरून कल्याणी आणि शफी यांच्यात वाद झाल्याची माहिती
पोलिसांच्या तपासात कल्याणीचे विजयवाड्यातील भवानीपुरम परिसरात मटणाचे दुकान चालवणाऱ्या शफी नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समोर आले. 17 सप्टेंबर रोजी पैशांवरून कल्याणी आणि शफी यांच्यात वाद झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कल्याणी शफीकडे वारंवार पैसे मागत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ती त्याच्याकडे पाच हजार ते दहा हजार रुपयांची मागणी करत होती. तसेच छोट्या सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही तिने शफीकडे पैसे मागितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पैशांवरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. या वादानंतर कल्याणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा : गर्भवती काकीसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा, तरुणाला वेगळाच संशय आला अन् घडंल थरारक हत्याकांड
