मृत्यूचं तांडव… विरारमध्ये कोव्हिड हॉस्पिटलच्या ICU वॉर्डला आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाने (Corona) रुग्ण दगावत असताना दुसरीकडे प्रशासन किंवा रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे देखील काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (23 एप्रिल) पहाटे मुंबईजवळील विरारमधील (Virar) एका रुग्णालयातील […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाने (Corona) रुग्ण दगावत असताना दुसरीकडे प्रशासन किंवा रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे देखील काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (23 एप्रिल) पहाटे मुंबईजवळील विरारमधील (Virar) एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. (ICU Fire) ही आग एवढी भीषण होती की, त्यात तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू (13 Patients Death) झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजेच्या सुमारास विरारमधील तिरुपती नगरच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमधील (Vijay Vallabh Hospital) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात अचानक आग लागली.
या आगीची माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी आगीचं स्वरुप अत्यंत भीषण असल्यानो अग्निशमन दलाच्या जवानांना ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही आग अटोक्यात आली.
Mumbai: भांडूपमधील सनराईज हॉस्पिटलला भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू









