धक्कादायक ! लग्नाला वर्ष होण्याआधीच जोडप्याची विष पिऊन आत्महत्या, गूढ कायम
परभणी जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याने विष पिऊन आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ जानेवारीला पती-पत्नीचा मृतदेह घरात आढळून आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरीही या आत्महत्येमागचं गूढ अद्याप कायम आहे. कातनेश्वर येथील मयत युवक, गंगाधर चापके याचा ८ महिन्यांपूर्वी पिंपळगाव येथील सपना या […]
ADVERTISEMENT
परभणी जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याने विष पिऊन आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ जानेवारीला पती-पत्नीचा मृतदेह घरात आढळून आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरीही या आत्महत्येमागचं गूढ अद्याप कायम आहे.
ADVERTISEMENT
कातनेश्वर येथील मयत युवक, गंगाधर चापके याचा ८ महिन्यांपूर्वी पिंपळगाव येथील सपना या युवतीसोबत विवाह संपन्न झाला होता. लग्नानंतर आठ महिने दोघांचा संसार सुखाने सुरु होता. ८ जानेवारीच्या रात्री गंगाधर आणि सपना जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. याचदरम्यान त्यांनी विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं.
सकाळी सपना आणि गंगाधर दोघेही उठत नसल्यामुळे घरच्यांनी दार तोडून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दोघांचेही मृतदेह आढळून आले. ज्यानंतर पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT