अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं?; ‘आप’च्या आमदारांची बोलावली बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीत मद्य धोरणाच्या आरोपावरून सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. या सगळ्यात आम आदमी पक्षाचे काही आमदार संपर्कात नसल्याची बाब समोर येत आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे, राजकीय घडामोडी पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी आत्तापर्यंत 54 आमदार आल्याचं कळतंय तर आठ आमदार दिल्लीच्या बाहेर आहेत त्यापैकी एक आमदार जेलमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

आपच्या आमदारांना दिली जाते आहे पैशांची ऑफर

भाजप दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप आमदार आतिशी मार्लेना यांनी केला आहे. आमच्या आमदारांना पैशांची ऑफर दिली जात असून त्यांना धमकावले जात आहे. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्यात आली आहे. हा काही पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयत्न केला आहे. मात्र ते नेहमीच अपयशी ठरले आहेत, असं ते म्हणाले.

40 आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा

हे वाचलं का?

केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पोहोचलेले तिमारपूरचे आपचे आमदार दिलीप पांडे यांनी दावा केला आहे की, 40 आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला होता. ते म्हणाले की, या 40 आमदारांना फोडण्यासाठी 20 कोटींनुसार 800 कोटी आले कुठून? याची ईडीने चौकशी करायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

आप आमदार म्हणाले- 20 कोटींची ऑफर मिळाली

ADVERTISEMENT

यापूर्वी आम आदमी पक्षाच्या 4 आमदारांनी भाजपवर प्रत्येकी 20 कोटी रुपयांची धमकी आणि ऑफर दिल्याचा आरोप केला होता. अशा स्थितीत भाजप आपले आमदार फोडू शकत नाही, अशी भीती आम आदमी पक्षाला आहे. त्यामुळे सायंकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत सर्व आमदारांना बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत किती आमदार सभेला पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे 62 आमदार आहेत.

ADVERTISEMENT

लक्ष विचलित करण्यासाठी आप नौटंकी करत आहे : कपिल मिश्रा

मनीष सिसोदियाजी यांची चोरी पकडली गेलीय. त्यामुळे आता लक्ष वळवण्यासाठी ‘आप’ रोज नवनवीन नौटंकी करत आहे. ज्या सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी माफियांना दारू विकली आहे, त्या सरकारमध्ये आमदार खरेदीची चर्चा म्हणजे केवळ तमाशा आहे. सिसोदिया हिमाचलच्या जनतेला सांगतील का? ती दारू माफियांना किती किंमतीत विकली गेली?, असा घणाघाती आरोप भाजप नेते कपिल मिश्रा यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT