Nanded Court: भर कोर्टात न्यायाधीशांवर फेकली चप्पल, नंतर..
कुवरचंद मंडले, नांदेड Accused threw slippers at judge in Nanded Court: नांदेड: नांदेडमधील (Nanded) सत्र न्यायालयामध्ये (Court) काल (11 जानेवारी) दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीने (Accused) चक्क न्यायाधीशांवरच (Judge) चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीच्या याच कृत्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी त्याला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा सुनावत लागलीच अद्दलही घडवली आहे. (accused threw slippers at judge in […]
ADVERTISEMENT

कुवरचंद मंडले, नांदेड
Accused threw slippers at judge in Nanded Court: नांदेड: नांदेडमधील (Nanded) सत्र न्यायालयामध्ये (Court) काल (11 जानेवारी) दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीने (Accused) चक्क न्यायाधीशांवरच (Judge) चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीच्या याच कृत्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी त्याला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा सुनावत लागलीच अद्दलही घडवली आहे. (accused threw slippers at judge in nanded court judge sentenced accused to 6 months)
कोर्टात नेमकं काय झालं?
दरोडा प्रकरणात अटक केलेला आरोपी दत्ता हंबर्डे याला पोलिसांनी सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं. पण या सुनावणीसाठी आरोपीचा वकीलच आला नसल्याने आरोपी दत्ता हंबर्डेने थेट न्यायाधीशांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी न्यायाधीश आणि आरोपीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ज्यानंतर अचानक आरोपीने आपल्या चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.
आरोपी दत्ताच्या या कृत्यामुळे न्यायाधीशांसह अवघं कोर्टरुम अवाक् झालं. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. पण त्यानंतर न्यायाधीशांनी या कृत्यासाठी आरोपीला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजारांचा दंड ठोठावला.