दिलासादायक बातमी ! मुंबईत दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १ हजाराच्या आत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई शहरात परिस्थिती हळुहळु रुळावर येत असल्याचं चित्र आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना आज मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ हजाराच्या आत आली आहे. आज शहरात ९२९ नवे रुग्ण सापडले असून गेल्या २४ तासांत ३० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. #CoronavirusUpdates28th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/kC20MwQ6Rx — माझी Mumbai, आपली BMC […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई शहरात परिस्थिती हळुहळु रुळावर येत असल्याचं चित्र आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना आज मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ हजाराच्या आत आली आहे. आज शहरात ९२९ नवे रुग्ण सापडले असून गेल्या २४ तासांत ३० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
#CoronavirusUpdates
28th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/kC20MwQ6Rx— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 28, 2021
गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची मुंबईची ही दुसरी वेळ आहे. य़ाआधी तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान शहरातली रुग्णसंख्या १ हजाराच्या आत होती. परंतू त्या काळात महापालिकेने चाचण्या कमी केल्यामुळे हा फरक दिसला होता. परंतू आज २९ हजाराच्या वर केलेल्या चाचण्यांमध्ये रुग्णसंख्या १ हजाराच्या आत आल्यामुळे शहरातली परिस्थिती आता हळुहळु रुळावर येत असल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, कोरोनाच्या लसीकरणाबाबत सध्या बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे लसींचा तुटवडा होत असताना दुसरीकडे इतरही अनेक अडचणी समोर येत आहेत. यातील एक समस्या अशी आहे की, लसीच्या पहिल्या डोससाठी कोविनवर आपण अपॉईटमेंट स्लॉट बुक केला पण काही कारणास्तव आपल्याला डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाता आलं नाही तर आपली नोंदणी रद्द होत असल्याचं समोर आलं आहे. अशावेळी नेमकं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता याबाबत सरकारने एक नवा नियम लागू केला आहे.
हे वाचलं का?
जर काही कारणास्तव आपला पहिला डोस घेणं राहून गेलं तरी आपण आता नव्याने लसीकरणासाठी नोंदणी करुन पुन्हा पहिला डोस घेऊ शकता. तशी तरतूद आता कोविनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस घेणं राहून गेलं असेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्यांना पहिल्या डोससाठी नव्याने नोंदणी करावी लागेल.
Maharashtra vs UP: उत्तर प्रदेशने लसीकरणात महाराष्ट्राला टाकलं मागे, यूपीने नेमकं केलं तरी काय?
ADVERTISEMENT
CoWIN पोर्टल कसं करावं रजिस्ट्रेशन?
ADVERTISEMENT
-
सगळ्यात आधी https://selfregistration.cowin.gov.in/ ओपन करा आणि इथे मोबाइल नंबर टाकून Get OTP वर क्लिक करा.
OTP प्राप्त झाल्यानंतर तो वेबसाइटवर भरा आणि ‘Verify’ वर क्लिक करा आणि ‘Register for Vaccination’ पेज वर आपलं फोटो ID प्रूफ, नाव, लिंग आणि जन्मतारीख ही सर्व माहिती भरा.
यानंतर आपल्याला अपॉईटमेंट शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. आपण ज्या व्यक्तीसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या बाजूला ‘Schedule’बटणवर क्लिक करा.
यानंतर आपला पिन कोड टाका आणि Search वर क्लिक करा. यानंतर आपल्याला या पिन कोडशी निगडीत सेंटर दिसू लागतील.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेंटर, तारीख आणि वेळ यांची निवड करुन ‘Confirm’ वर क्लिक करायचं आहे. एक यूजर हा चार सदस्यांसाठी व्हॅक्सिनेशन बुक करु शकतो.
Free Vaccination: मोफत लसीकरणाच्या निर्णयातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT