अभिनेते रवींद्र मंकणींच्या मुलाला अटक, कोणत्या प्रकरणी करण्यात आलीए कारवाई?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याला अटक केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. पुण्याच्या सायबर सेलने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळते आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेली तसंच काही निष्क्रिय खात्यांचा म्हणजेच (डोरमंट अकाउंटचा) डेटा चोरून तब्बल 216 कोटींचा डेटा एका व्यक्तीला विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने जेरबंद केले आहे.

ADVERTISEMENT

याच टोळीमध्ये मराठीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचादेखील या घोटाळ्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे 10 आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांना आयटी क्षेत्रातला जवळपास 10 वर्षांचा अनुभव आहे तसेच हे काही आयटी कंपनीत काम देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

PMLA SCAM: सुशील कुमार शिंदेंच्या जावयाची मालमत्ता ED ने केली जप्त

पुणे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली?

ADVERTISEMENT

‘या आरोपींनी कंपनीमध्ये असताना काही चालू आणि बंद असलेल्या बँक खात्याची माहिती चोरली होती. अशा प्रकारची माहिती एका व्यक्तीला दिली जाणार असल्याची खास माहित आम्हाला मिळाली. अशी माहिती मिळताच आम्ही अनेक दिवसांपासून या टोळीच्या मागावर होतो. अखेर तपासाअंती या टोळीला जेरबंद करण्यात आम्हाला यश आले आहे.’ अशी माहिती सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेता सचिन जोशीला ईडीने ठोकल्या बेड्या

पोलिसांनी पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम, दोन चारचाकी वाहनं आणि 11 मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे मंकणी कुटुंबीयांना मात्र मोठा धक्का बसला आहे. रवींद्र मंकणी यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची मोठी छाप सोडली आहे. मात्र, त्यांच्या मुलाला अशाप्रकरणी अटक झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आता याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जावी यासाठी पोलिसांकडून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच याप्रकरणी इतरही काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT