कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अभिनेता सोनू सूदने सांगितला उपाय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सोदने गरीब तसंच अनेक गरजूंना मदत केली. सोनू फक्त लोकांची मदतच करत नाही तर संवेदनशील मुद्द्यांवर त्याची मतं देखील मांडतो. नुकतंच सोनूने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द व्हाव्या यासाठी देखील पुढाकार घेतला होता. तर आता सोनूने कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आहे.

नुकतंच सोनूने एक ट्विट केलं आहे. सोनूचं हे ट्विट सध्या बरंच चर्चेत आहे. सोनू त्याच्या ट्विटमध्ये लिहीतो, ‘महामारीची सगळ्यात मोठी शिकवण; देश वाचवायचा असेल तर दवाखाने बनवावे लागतील’. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

सोनूच्या ‘सोनू सूद या फांउडेशन’मार्फत रोज अनेकांना मदत केली जाते. तसंच गेल्यावर्षी लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इतकंच नाही तर सोनूने लसीकरणाबाबत देखील सरकारकडे एक खास मागणी केली होती. सोनू म्हणाला होता, “मी आरोग्य मंत्रालयाला विनंती करतो की, 25 वर्षांच्या वरील व्यक्तींना देखील कोरोनाची लस देण्यात यावी. ज्या प्रकारे सध्या कोरोनाचे रूग्ण वाढतायत त्यामध्ये मुलांना देखील कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की कोरोना लसीकरण हे 25 वर्षांच्या पुढील असणाऱ्या व्यक्तींना देण्यात यावं.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT