बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शशिकला यांचं राहत्या घरीच निधन झालं आहे. शशिकला यांनी गुमराह, आरती तसंच तीन बहुरानिया या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

ADVERTISEMENT

शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जवळकर होतं. शशिकला यांचा जन्म 4 ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात बरेच चढ-उतार पाहिले होते. शशिकला यांचे वडील बिझनेसमॅन असल्याने त्यांचं बालपण फार आरामात गेलं होतं. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्याचा तसंच गाण्याचा छंद होता. वडिलांचा बिझनेस ठप्प झाल्याने त्या मुंबईत कामाच्या शोधासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांची ओळख नूर जहाँ यांच्याशी झाली. नूर जहाँ यांचे पती शौकत रिझवी यांच्या ‘जीनत’ या सिनेमामधून पदार्पण केलं होतं.

हे वाचलं का?

शशिकला यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये नायिका तसंच खलनायिकेचीही भूमिका त्यांनी केल्या आहेत. सिनेमांसोबत शशिकला यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. दरम्यान 2007 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT