ब्रा साईझच्या वक्तव्यामुळे श्वेता तिवारी अडचणीत, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी FIR

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आता नव्या अडचणीत सापडली आहे. याचं कारण तिने भोपाळमध्ये केलेलं वक्तव्य. मेरी ब्रा का साईज भगवान ले रहे हैं असं वक्तव्य श्वेता तिवारीने केलं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. धार्मिक भावना दुखावाल्या प्रकरणी श्वेता तिवारी विरोधात भोपाळच्या श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात कलम 295 अ अन्वये FIR दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

एका वेबसीरिजच्या घोषणेच्या कार्यक्रमात श्वेता तिवारी आणि इतर कलाकार प्रश्नांना उत्तरं देत होते. त्यावेळी अचानक हसत हसत श्वेता तिवारी वादग्रस्त वाक्य बोलून गेली. ‘माझ्या ब्रा ची साईझ आता देवच घेतो आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीने केलं आहे. श्वेताच्या एका वाक्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्यावरून वादही निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनिष हरिशंकर दिग्दर्शित वेबसीरिजमधले काही कलाकार प्रमोशनसाठी आणि वेबसीरिजच्या घोषणेसाठी भोपाळला गेले होते. त्यावेळी हसत हसत श्वेता तिवारीने हे वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी आता अहवाल मागवला आहे. मी ते वादग्रस्त वक्तव्य ऐकलं आहे. श्वेता तिवारी एक कलाकार आहे तिने असं वक्तव्य करणं मुळीच योग्य नाही. मी भोपाळच्या पोलीस आयुक्तांकडे या संबंधीचा अहवाल मागितला आहे त्यानंतर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हसत हसत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून श्वेता अडचणीत आली आहे.

ADVERTISEMENT

श्वेता तिवारीने देवाबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. माझ्या ब्रा ची साईझ आता देवच घेतो आहे असं ती म्हणाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तिने केलेला हा विनोद आता तिला भोवण्याची पूर्ण चिन्हं आहेत. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी ही टीव्हीवरची फेमस जोडी होती. या दोघांनी नच बलियेमध्येही भाग घेतला होता. 1998 मध्ये या दोघांचं लग्न झालं आणि 2007 मध्ये घटस्फोट. श्वेताने राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एवढंच नाही तर राजानेही श्वेता ज्या ठिकाणी शुटिंग करते आहे तिथे सेटवर जाऊन हंगामा केला होता. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव पलक तिवारी असं आहे.

ADVERTISEMENT

राजा चौधरीपासून काडीमोड घेतल्यानंतर 2013 मध्ये अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी यांनी लग्न केलं. सगळं बरं चाललं होतं. मात्र अचानक दोघांमध्ये खटके उडू लागले. या दोघांना रेयांश नावाचा मुलगा आहे. मुलावरून या दोघांमध्ये खटके उडू लागले. श्वेताने अभिनव कोहलीच्या विरोधातही घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले आहेत. ती पोलीस ठाण्यातही गेली होती. अभिनव माझ्या मुलीला शिवीगाळ करतो असाही आरोप तिने केला होता. रेयांशचा ताबा कुणाकडे राहिल यावरून दोघांमध्येही वाद निर्माण झाला आहे. अभिनवनेही तिच्यावर आरोप केले आहेत. श्वेता आपल्याला मारहाण करते असा आरोप त्याने केला होता. 2019 पासून या दोघांमध्ये कोर्टात भांडण सुरू आहे. त्याचा फैसला अद्याप लागलेला नाही. अशात आता आपल्याच वक्तव्यामुळे श्वेता तिवारी नव्या वादात सापडली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT