Andheri By Poll : लटकेंच्या बाजूने निकाल लागताच अंधेरीची जागा भाजपला गेली? मुरजी पटेलांचे पोस्टर व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लटके यांची उमेदवारी आता अंतिम झाली असून त्या उद्या सकाळी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल देताच बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीत अंधेरीची जागा भाजपला गेली असल्याची माहिती मिळत आहे. कोर्टात निकाल लागताच भाजप आणि महायुतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल उद्या (शुक्रवारी) अर्ज भरणार असल्याचे पोस्टर सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसली तरीही या पोस्टरनुसार मुरजी पटेल (शुक्रवारी) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित फॉर्म भरणार आहेत.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे पोस्टरमध्ये?

लढू.. जिंकू… इतिहास घडवू असं सुरुवातीला या पोस्टरमध्ये ठळक अक्षरात म्हटलं आहे. सोबत १६६ – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीच्या वतीने आपले लाडके नेते आणि अधिकृत उमेदवार श्री मुरजी पटेल (काका) आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित हा अर्ज भरणार आहेत.

स्थान : शेरेपंजाब बीएमसी मैदान, संकट मोचन हनुमान मंदिर जवळ, जिजामाता मार्ग, अंधेरी पूर्व. सकाळी ठिक ९ वाजता.

ADVERTISEMENT

मुरजी पटेल काल भरणार होते अर्ज :

शिंदे गट किंवा भाजपकडून अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत उमेदवाराची घोषणा केली नव्हती. मात्र मुरजी पटेल यांनी इथून तयारी सुरु केली होती. त्यामुळे ही जागा नेमकी कोण लढविणार? भाजप की शिंदे गट? मुरजी पटेल कोणाचे उमेदवार असणार? शिंदे गटाने लढविल्यास शिंदे – ठाकरे वादाची शक्यताही लक्षात घेण्यात आली होती. मात्र ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारताच ही जागा भाजपला गेली आहे? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT