मुश्रीफांची टीका जिव्हारी, सतेज पाटलांनी थेट दिलं ओपन चॅलेंज

मुंबई तक

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

Gokul Election
Gokul Election
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुश्रीफांची टीका जिव्हारी

point

सतेज पाटलांनी थेट दिलं ओपन चॅलेंज

Gokul Election : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापू लागली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीने एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि आव्हाने देण्यास सुरुवात केली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मुश्रीफांचा सतेज पाटलांना सल्ला

या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना थेट महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पूर्वी महानगरपालिका निवडणुकांमध्येही मुश्रीफ यांनी पाटील यांना सर्व नगरसेवकांसह पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तोच धागा पकडून आताही त्यांनी सतेज पाटील यांना विनाकारण निवडणूक लढण्यात काही अर्थ नसून, त्यांनी आता शांत बसून आम्हाला पाठिंबा द्यावा, असा सल्ला दिला आहे. विरोधी शक्ती आपोआप कशी लुप्त झाली, या प्रश्नावर बोलताना त्यांनी कोणतीही जादू केली नसून हे सर्व आपोआप झाल्याचा दावा केला.

हे ही वाचा : चक्रीवादळ तयार होणार की नाही? पाऊस कुठले भाग झोडपणार?

'महायुतीत काँग्रेसचे किती उमेदवार?'

हसन मुश्रीफ यांच्या या टीकेवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. महायुतीला निवडणूक लढवण्याची काळजी वाटत असल्यानेच ते बहुधा आमच्याकडे पाठिंबा मागत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. आमचा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का असून आम्ही या निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महायुती म्हणून निवडणूक लढवणाऱ्या या पॅनेलमध्ये काँग्रेसचे नेमके किती उमेदवार असणार आहेत, याकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगत त्यांनी महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर आणि रणनीतीवरही निशाणा साधला.

हे ही वाचा : Personal Finance: बजेटिंग App वापरल्याने खरंच बचत वाढते का?

'सहा महिन्यातील तमाशा त्यांनी बघितलाय'

विरोधकांकडे 4400 पेक्षा जास्त ठराव असल्याच्या दाव्यावर बोलताना सतेज पाटील यांनी, त्यांच्याकडे 5000 ठराव आहेत असे गृहीत धरूनच त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे थेट आव्हान दिले. जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादकांना आणि ठरावधारकांना गेल्या सहा महिन्यांत चाललेला तमाशा चांगलाच माहीत असून, एकमुखी सत्ता कोणाला द्यायची याचा योग्य निर्णय ते आमच्याच बाजूने घेतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या एकतर्फी विजयाच्या दाव्यावर बोलताना, स्वतःच्या लोकांमध्ये निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्यासाठी त्यांना असे बोलणे भाग पडत असले तरी त्यात त्यांना यश येणार नाही, असे सतेज पाटील यांनी ठणकावून सांगितले.