श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर संपूर्ण भारत पदयात्रा करणारे राहुल गांधीच : पटोले
रत्नागिरी : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पदयात्रा सुरु केली आहे. देशाचा तिरंगा सहिसलामत रहावा म्हणून ही पदयात्रा आहे. राहुल गांधी म्हणाले, माझ्या वडिलांना मी या भुमीत गमावलं आहे. पण आता माझ्या देशाचा तिरंगा मी गमवू देणार नाही. माझ्या देशाचे संविधान मी गमवू देणार नाही. म्हणून देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचे […]
ADVERTISEMENT

रत्नागिरी : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पदयात्रा सुरु केली आहे. देशाचा तिरंगा सहिसलामत रहावा म्हणून ही पदयात्रा आहे. राहुल गांधी म्हणाले, माझ्या वडिलांना मी या भुमीत गमावलं आहे. पण आता माझ्या देशाचा तिरंगा मी गमवू देणार नाही. माझ्या देशाचे संविधान मी गमवू देणार नाही. म्हणून देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचे संकल्प घेवून निघाले आहेत, अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा उद्देश सांगितला.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे धोपेश्वर रिफायनरीबाबत आढावा घेण्यासाठी नाना पटोले आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पटोले पुढे म्हणाले, काही लोक हिंदुंचा गवगवा करतात. पण भगवान श्रीराम पहिल्यांदा काश्मीर ते कन्याकुमारी चालत गेले होते. मग शंकराचार्य गेले होते, त्यानंतर रामदास स्वामी गेले होते. आता चौथे राहुल गांधी निघाले आहेत. मग आता धर्माचे पालन कोण करते? हे तर काहीच नाही. काही जण महाराजे बनल्यासारखे गाडीतुन रथयात्रा काढतात. पण राहुल गांधी देशाला एकत्रित आणण्यासाठी पायी निघाले आहेत.
कॉंग्रेस पक्ष विकासासोबत :
यावेळी शासकीय विश्रामगृह येथे रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली आणि आपली भूमिका त्यांना सांगितली. यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष हा विकासासोबत राहिलेला आहे आणि राहणार असे स्पष्ट केले.
नाना पटोलेंनी घेतली विरोधकांची भेट :
समर्थकांची भेट घेतल्यानंतर नाना पटोले गोवळ येथे रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी गेले. मोठ्या संख्येने इथे रिफायनरी विरोधक उपस्थित होते. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडली.