30 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला पुन्हा कुटुंबाला भेटली, ठाणे मनोरुग्णालयात दिसला इमोशल सिन
नाशिक पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडलेल्या या महिलेची नोंद घेतली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा त्यांना लक्षात आलं की तिची स्मरणशक्ती गेली आहे, तेव्हा त्यांनी तिला उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात दाखल केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाणे मनोरुग्णालयात दिसला भावनिक सिन

30 वर्षानंतर कुटुंबाला भेटली महिला

काही दिवस नाशिकच्या पंचवटीमध्ये होती महिला
ठाणे मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एका कुटुंबाला 30 वर्षांपूर्वी हरवलेली महिला परत मिळाली आहे. मुळ अहमदनगरची असलेली ही महिला 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचं कुटुंबाने सांगितलंय. आता या ८० वर्षीय महिलेला पुन्हा तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. कुटुंबाला भेटल्यानंतर ती महिला भावूक झाली. या महिलेच्या 13 वर्षांच्या मुलाचा चिंचेच्या झाडावर चढल्यानंतर विजेचा धक्का बसून दुःखद मृत्यू झाला होता. महिलेला हा धक्का सहन झाला नाही आणि तिची मानसिक स्थिती बिघडली. त्यानंतर ती महिला घरातून बेपत्ता झाली. नंतर ती महिला नाशिकला पोहोचली, तिथे ती वर्षानुवर्षे पंचवटी परिसरात भटकत होती.
हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी
दोन वर्षांपूर्वी, नाशिक पोलिसांनी शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडलेल्या या महिलेची नोंद घेतली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा त्यांना लक्षात आलं की तिची स्मरणशक्ती गेली आहे, तेव्हा त्यांनी तिला उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील वैद्यकीय पथकानं तिच्यावर उपचार केले. जेव्हा महिलेमध्ये सुधारणा दिसून आली, तेव्हा टीमने तिची ओळख पटवण्यासाठी आणि कुटुंबाचा शोध घेण्यासाठी काम सुरू केलंय.
अनेक वर्षांनी कुटुंबाला भेटल्यानंतर महिला भावूक
डॉ. मलिक म्हणाले, ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. कारण महिलेला पूर्वीचं काहीच आठवत नव्हतं. पण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हळूहळू त्यांच्या गावाबद्दलचे संकेत एकत्र केले. मग त्यांनी सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहमदनगरमधील पोलिसांशी संपर्क साधला आणि तिथे महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला. माहिती मिळाल्यानंतर, महिलेच्या कुटुंबातील सदस्य ज्यामध्ये तिची सून, चुलत भाऊ आणि पुतणे हे 17 जानेवारी रोजी रुग्णालयात आले. 30 वर्षांत पहिल्यांदाच ही महिला त्यांना भेटली. इतक्या वर्षांनी तिच्या कुटुंबाला भेटल्यानंतर ती महिला भावूक झाली. सोबतच कुटुंबातील सदस्यही भावनिक झाले.
हे ही वाचा >> Krishna Andhale Wanted : कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांनी जाहीर केलं प्रसिद्धी पत्रक
कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, वैद्यकीय पथकाने केलेल्या उपचारामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. त्याच वेळी, डॉ. मलिक म्हणाले की, कुटुंबाला पुन्हा एकत्र पाहणं हे आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे.