तुफान टीकेनंतर अजित पवारांनी अखेर ‘तो’ निर्णय बदलला, सोशल मीडियासाठी 6 कोटींचा निर्णय रद्द
मुंबई: ‘उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा.’ असे आदेश आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी (Social Media) सरकार 6 कोटीचा (6 crore) खर्च करणार होती. पण जेव्हा माध्यमांनी हा विषय पुढे आणला आणि यावर चहू बाजूंनी […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा.’ असे आदेश आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी (Social Media) सरकार 6 कोटीचा (6 crore) खर्च करणार होती. पण जेव्हा माध्यमांनी हा विषय पुढे आणला आणि यावर चहू बाजूंनी टीका (criticism) सुरु झाली तेव्हा एक पाऊल मागे येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय रद्द (Decision canceled) करत असल्याचं जाहीर केलं.
पाहा 6 कोटीचा खर्चाचा तो निर्णय रद्द करताना अजित पवार नेमकं काय म्हणाले?
‘उपमुख्यमंत्री कार्यालयाला सोशल मीडियावर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सोशल मीडियाची जबाबदारी बाह्य यंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल.’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी ठाकरे सरकार खर्च करणार तब्बल 6 कोटी