NIA नुसार PPE KIT घातलेली ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच!
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार पार्क करताना CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती PPE कीट मध्ये दिसून आला होता. याबाबत आता एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तो म्हणजे PPE किट मधील व्यक्ती ही सचिन वाझेच होती. याबाबत NIA नेच माहिती दिली असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात […]
ADVERTISEMENT
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार पार्क करताना CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती PPE कीट मध्ये दिसून आला होता. याबाबत आता एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तो म्हणजे PPE किट मधील व्यक्ती ही सचिन वाझेच होती. याबाबत NIA नेच माहिती दिली असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सचिन वाझे हे अधिकाधिक अडकत असल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं त्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी NIA ने सुरू केली होती. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेला संशयित कोण होता हे देखील NIA कडून तपासण्यात येतं होतं. त्यावेळी तिथे सचिन वाझे हजर होते की नव्हते हे देखील तपासलं गेलं. याप्रकरणी NIA ने केलेल्या तपासात आता अशी माहिती समोर आली आहे की, पीपीई किट घातलेली व्यक्ती ही दुसरी-तिसरी कुणीही नसून ते सचिन वाझेच आहेत.
मोठी बातमी ! वाझेंच्या सोसायटीमधलं ते CCTV फुटेज NIA च्या ताब्यात
हे वाचलं का?
PPE किटचं नेमकं प्रकरण काय?
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या कारचं सीसीटीव्ही फुटेज १० मार्चला समोर आलं. या कारमध्ये एक पीपीई किट घातलेला माणूस होता जो काही वेळ कारमध्ये बसला आणि त्यानंतर तो कार सोडून निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेला माणूस स्पष्टपणे दिसतो आहे.
ADVERTISEMENT
हा संशयित नेमका कोण होता याची चौकशीही NIA ने सुरू केली होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार इंटेरिअर व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर भागात आढळून आला. या भागातही NIA ने जाऊन काही फोटो काढले आणि काही ठिकाणचे व्हीडिओही घेतले होते.
ADVERTISEMENT
अँटेलिया बाहेर स्कॉर्पिओ कार सचिन वाझेंनीच ठेवली?, NIAला संशय
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएसकडून केला जातो आहे. मनसुख हिरेन प्रकरणातही सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांनी जो जबाब नोंदवला त्यामध्ये माझ्या पतीचा खून झाला असून त्यांचा खून सचिन वाझेंनी केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणातही संशयाची सुई सचिन वाझेंकडेच अंगुलीनिर्देश करते आहे.
NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे, ज्यामुळे API सचिन वाझे यांच्याभोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली.
पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसून आलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIAच्या तपासातून समोर आलं होतं. सचिन वाझे ज्या गुन्हे तपास शाखेत अर्थात CIUमध्ये कार्यरत होते, त्या शाखेमध्ये ही इनोव्हा कार वापरली जात होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT