Amboli : मृतदेह फेकताना स्वतःच दरीत पडला… आंबोलीच्या घाटात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Crime news in marathi)

ADVERTISEMENT

कोल्हापूर (भरत केसरकर) : मारहाण करताना मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह फेकताना दरीत पडून मारहाण करणाऱ्या तरुणाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंबोली घाटात घडली आहे. सुशांत आप्पासो खिलारे (३५) असं मारहाण करताना मृत्यू झालेल्या तरुणाचं तर भाऊसो अरूण माने (३०) असं मृतदेह फेकताना मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत भाऊसो मानेसोबत आलेल्या सुशांत आप्पासो खिलारे (३५) तरुणानं माहिती दिली आहे. (Amboli ghat crime news While throwing the body, it fell into the valley itself)

नेमकं काय आहे प्रकरण?

भाऊसो अरूण माने (रा. कराड) याला वीटभट्टीचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याला कामगारांची आवश्यकता होती. अशात सुशांत आप्पासो खिलारे (रा.कासेगाव) यानं आपण तुला कामगार पुरवतो असं सांगून एक ते तीन लाख रूपये अ‍ॅडव्हान्स घेतले. वर्ष उलटलं तरी ना कामगार दिले ना पैसे परत केले.

हे वाचलं का?

Cabinet Meeting : राज्यगीत ते स्पर्धा परीक्षा शुल्क निश्चिती; काय निर्णय झाले?

याकाळात पैशांसाठी भाऊसो मानेने अनेकदा विचारणा केली. पण सुशांत खिलारेने पैसा देण्यास टाळाटाळ केली. अखेरीस वैतागून भाऊसो मानेने सुशांत खिलारेला गाडीतून कोल्हापूरजवळील किणी टोल नाक्यावर आणलं. यावेळी भाऊसोने स्वतःसोबत नातेवाईक तुषार पवारलाही आणलं होतं. टोल नाक्यावर पोहचताच भाऊसो आणि तुषार या दोघांनीही सुशांतला मारहाण करण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकर की रोहित पवार; MPSC परीक्षार्थ्यांना कोणामुळे दिलासा?

ADVERTISEMENT

पण या मारहाणीच्या भितीने सुशांत खिलारेचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते आंबोलीत आले. आंबोलीत मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर हा मृतदेह फेकताना भाऊसो मानेचा पाय घसरुन तोल गेला आणि सुशांत खिलारेच्या मृतदेहासोबत दरीत पडला. यावेळी तिथं असलेल्या सहआरोपी तुषार पवार रात्री अकरा वाजेपर्यंत गाडीत बसून राहिला. अखेर भीतीने त्यांनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. आणि सत्य समोर आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT