मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला

मुंबई तक

क्रूझ पार्टी प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. या प्रकरणात मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. त्यामुळे आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलं आहे. मलिकांकडून होत असलेल्या आरोपांवरून अमृता फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे. समीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

क्रूझ पार्टी प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. या प्रकरणात मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. त्यामुळे आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलं आहे. मलिकांकडून होत असलेल्या आरोपांवरून अमृता फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एनसीबीच्या काही कारवायांबद्दल नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर या मागे भाजप असल्याचा आरोपही त्यांच्याकडून होत असून, माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी ‘बॉम्ब’ फोडला, नवाब मलिकांवरचे ‘ते’ आरोप जसेच्या तसे

त्यानंतर मंगळवारी (9 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं आणि त्यांनी स्वस्तात भुखंड घेतल्याचा आरोप केला. त्याला मलिक यांनी उत्तर दिलं असून, दोन्ही नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर अमृता फडणवीसांनी ट्वीट करत मलिकांवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

    follow whatsapp