Andheri By Election : ऋतुजा लटकेंसह सर्व उमेदवारांपेक्षा NOTA ला जास्त मतं पडली, तर काय होईल?

मुंबई तक

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. आता रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आहेत. भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मध्यंतरी एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यात नोटाचा पर्याय निवडण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आरोप केला की मतदारांना पैसे देऊन नोटा पर्याय निवडण्याचे आवाहन केलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. आता रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आहेत. भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मध्यंतरी एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यात नोटाचा पर्याय निवडण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आरोप केला की मतदारांना पैसे देऊन नोटा पर्याय निवडण्याचे आवाहन केलं जात आहे.

पण खरोखर नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली तर ती निवडणूक रद्द होते का? नोटा पर्याय नेमका असतो काय? समजून घेऊयात.

नोटा पर्याय काय आहे? तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही तुम्हाला हवा तो लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार तुम्हाला या मतदानातून मिळतो. पण नोटा हा पर्याय असा आहे, ज्यामुळे तुम्हाला कुठलाच लोकप्रतिनिधी पटत/आवडत नसेल तर त्याला नाकारण्याचा अधिकार मिळतो. असं होऊ शकतं की तुम्हाला एकही लोकप्रतिनिधी आवडत नसेल, तुम्हाला राजकीय परिस्थिती पटत नसेल, अशा परिस्थितीत मतदान न करण्यापेक्षा तुमची हीच भावना मतदानातून समोर यावी यासाठी हा नोटा पर्याय आहे. नोटा म्हणजे नन ऑफ द अबॉव.

सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय सांगतात?

People’s Union for Civil Liberties Vs Union of India 2013 च्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देशीत केलेलं की, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये NOTA चा पर्याय द्यायला हवा. राईट टू सीक्रेसी यात कायम राहिल, असंही कोर्टाने म्हटलेलं, कोर्टाचं त्यावेळेला मानणं होतं की नोटासारख्या पर्यायामुळे राजकीय पक्षसुद्धा योग्य उमेदवारच निवडणुकीला उभा करतील.

नोटाचा वापर पहिल्यांदा २०१३ मध्ये झाला होता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मिझोरम विधानसभा निवडणुकीत झाला होता, जेव्हा १५ लाख मतदानांनी नोटाला मत दिलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp