मुंबईची खबर: सेंट्रल मुंबईतील पहिला ट्विन केबल ब्रिज! वाहतूक केंद्रच नव्हे तर पर्यटन स्थळ सुद्धा...

मुंबई तक

या भव्य उड्डाणपूलाचं बांधकाम जवळपास 35 टक्के पूर्ण झालं असून हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. या पुलामुळे दादर परिसरात वर्षानुवर्षे सुरू असलेली वाहतूक कोंडी कमी होईल.

ADVERTISEMENT

सेंट्रल मुंबईतील पहिला ट्विन केबल ब्रिज!
सेंट्रल मुंबईतील पहिला ट्विन केबल ब्रिज!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सेंट्रल मुंबईतील पहिला ट्विन केबल ब्रिज!

point

वाहतूक केंद्रच नव्हे तर पर्यटन स्थळ सुद्धा...

Mumbai News: मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत शहरातील पहिल्या ट्विन ब्रिजच्या बांधकामाला गती मिळाल्याची बातमी समोर आली आहे. या भव्य उड्डाणपूलाचं बांधकाम जवळपास 35 टक्के पूर्ण झालं असून हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. या पुलामुळे दादर परिसरात वर्षानुवर्षे सुरू असलेली वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका 

दादरच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणाऱ्या 100 वर्षे जुन्या टिळक उड्डाणपुलाच्या जागी हा ट्विन केबल-स्टेड पूल बांधला जात आहे. तसेच, या नवीन पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच जुना टिळक पूल पाडला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे सध्याची वाहतूक विस्कळीत होणार नाही. सध्याच्या काळात, या परिसरात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. या ट्विन ब्रिजमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीचं काम   

मागील काही वर्षांपासून मुंबईत ब्रिटिश काळातील धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. शीव आणि प्रभादेवी पुलांवर सुद्धा काम सुरू असून हा उड्डाणपुल ट्रॅफिकसाठी बंद आहे. यामुळे इतर उड्डाणपुलांवर, विशेषतः टिळक पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे, टिळक पुलाच्या पुनर्बांधणीला वेग आला आहे असून पुढील वर्षी हा नवीन पूल प्रवाशांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत मॅनेजर पदाची नोकरी हवीये? मग, 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज... काय आहे पात्रता?

कधी येणार प्रवाशांच्या सेवेत? 

हा 600 मीटर लांबीचा, सहा-लेनचा ट्विन केबल-स्टेड फ्लायओव्हर दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. प्रत्येक पूल हा 16.7 मीटर रुंद असणार आहे. यामुळे मागील पुलापेक्षा जास्त जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन लेनचं कार्य एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिमेकडील वाहतूकीला वेग येणार आहे. यानंतर, दुसऱ्या टप्प्याचं कार्य पुढील 18 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची योजना असून 2028 पर्यंत हा सहा-लेनचा पूल लोकांच्या सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp