'..मी कट्टर भाजपची', पुरस्कार मिळताच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, आता किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

मुंबई तक

Nivedita Saraf on BJP : '..मी कट्टर भाजपची', पुरस्कार मिळताच दिग्गज मराठी अभिनेत्री BJP च्या प्रेमात, बिहारबाबतही भाष्य

ADVERTISEMENT

Nivedita Saraf on BJP
Nivedita Saraf on BJP
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'..मी कट्टर भाजपची', महेश कोठारे यांच्यानंतर मराठी अभिनेत्री BJP च्या प्रेमात,

point

बिहारच्या निवडणूक निकालाबाबतही थेट भाष्य

Nivedita Saraf on BJP : "आमदार संजय केळकर तुमचं बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन.. मी कट्टर भाजपची असल्यामुळे मला आनंद झालाय", असं वक्तव्य मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलंय. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात निवेदिता सराफ यांना गंधार गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी भाजपचं कौतुक केलंय. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी देखील आपलं भाजप प्रेम उघडपणे बोलून दाखवलं होतं. आता निवेदिता सराफही भाजपच्या प्रेमात पडल्या आहेत. दरम्यान, महेश कोठारे यांनी भाजपबद्दल भाष्य केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 

हेही वाचा : पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय! दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीची निर्घृण हत्या... नंतर, मृतदेह नाल्यात फेकला

निवेदिता सराफ यांच्या वक्तव्याचं भाजपकडून स्वागत 

भाजपने निवेदिता सराफ यांच्या मतांचे स्वागत केले आहे. या संदर्भात बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, निवेदिता सराफ यांनी व्यक्त केलेले विचार हे भाजप जनतेच्या मनात किती दृढपणे रुजली आहे, याचे द्योतक आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, “यापूर्वीही महेश कोठारे यांनी अशाच प्रकारे भाजपला साथ दर्शवली होती. प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे, मात्र त्यावरून राजकारण करणे योग्य नाही. ही आपली परंपरा नाही. भाजप लोकांच्या विचारांत आणि मनात आहे, आणि तेच या विधानांमधून स्पष्टपणे दिसून येते.”

वर्षा गायकवाड यांची सराफ दाम्पत्यावर टीका 

निवेदिता सराफ यांच्या विधानावर विरोधकांनी तात्काळ नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सरकारकडून मिळालेले सन्मान यामागे कारणीभूत असावेत. त्यामुळेच निवेदिता सराफ यांनी भाजपच्या बाजूने भूमिका घेतली असावी, असे त्यांचे मत आहे. पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवरच त्यांची भूमिका भाजपकडे झुकल्याचे वर्षा गायकवाड यांनी सूचित केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp