"त्या काकांनी मला चॉकलेट दिलं आणि माझ्यासोबत..." 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत 67 वर्षीय वृद्धाचं घृणास्पद कृत्य!

मुंबई तक

एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून 67 वर्षीय वृद्ध नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीसोबत 67 वर्षीय वृद्धाचं घृणास्पद कृत्य!
अल्पवयीन मुलीसोबत 67 वर्षीय वृद्धाचं घृणास्पद कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत 67 वर्षीय वृद्धाचं घृणास्पद कृत्य!

point

"त्या काकांनी मला चॉकलेट दिलं आणि माझ्यासोबत..." पीडिता म्हणाली

Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून 67 वर्षीय वृद्ध नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीचं नाव शाहिद असून पोलिसांनी त्याला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. 

भरपूर चॉकलेट्स आणि पैसे सुद्धा दिले...

संबंधित प्रकरण हे बिजनौरच्या नगीना कस्बा येथील असल्याचं समोर आलं आहे. येथे राहणारी एक 8 वर्षांची मुलगी दररोज शाळेत असताना आरोपी शाहिद तिला चॉकलेट द्यायचा. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पीडिता तिच्या घरी पोहोचली असता तिच्याजवळ भरपूर चॉकलेट्स आणि दहा रुपयांची नोटसुद्धा होती. मुलीच्या आईने पीडितेला तिच्याजवळ असलेल्या चॉकलेट्स आणि पैशांबद्दल विचारलं असता, मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आणि तिच्या आईला मोठा धक्का बसला. 

चॉकलेट्सचं आमिष दाखवून अश्लील कृत्ये...

पीडिता तिच्या आईला म्हणाली की, शाळेत जात असताना दाढी असलेला एक वृद्ध माणूस तिला नेहमी चॉकलेट आणि बिस्किटे देतो. इतकेच नव्हे तर तो, तिच्याशी घाणेरड्या पद्धतीने बोलतो. हे ऐकून मुलीच्या आईने तिला त्या दाढीवाल्या व्यक्तीकडे घेऊन जाण्यास सांगितलं. मुलगी आणि तिची आई आरोपी शाहिदकडे गेल्यावर शाहिद घाबरला. त्याने त्याचे वय सांगून तिला शांत राहण्याची विनंती केली. मात्र, मुलीच्या आईने त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावलं. 

हे ही वाचा: एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...

आरोपी वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल 

त्यानंतर, पीडितेच्या आईने शाहिदला शिवीगाळ केली. पोलीस सुद्धा त्यावेळी घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी आरोपीला पोलिस ठाण्यात नेलं. त्यानंतर, महिलेने नगीना पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आणि शाहिदविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. यावर कारवाई करत पोलिसांनी घृणास्पद कृत्य, अश्लीलता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp