कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून, मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला
Ahilyanagar Crime : कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून, मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून
मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला
Ahilyanagar Crime, अहिल्यानगर : मिरजगाव परिसरात शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी उघड झालेल्या निघृण हत्याकांडाने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्जत तहसील कार्यालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या प्रल्हाद सोनाजी साळवे यांचा मृतदेह थेरगाव शिवारातील जांभळ ओढ्याजवळ असलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पत्र्याच्या खोलीत आढळून आला. सकाळी सुमारे नऊ वाजता ही घटना उघडकीस आली असून, प्राथमिक तपासात हा खून अनैतिक प्रेमसंबंधातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रल्हाद साळवे हे 12 नोव्हेंबरपासून घराबाहेर गेले होते. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. मात्र दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर खुनाचा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणात महत्त्वाचा हात असल्याचा संशय असलेल्या महिला जमली ऊर्फ संध्या गोरख भोसले हिला पोलिसांनी अटक केली आहे.
मयत प्रल्हाद साळवे यांचा मुलगा शुभम प्रल्हाद साळवे (वय 23, रा. रमजान चिंचोली) यांच्या फिर्यादीवरून जमली भोसले आणि तिचा भाऊ धन्या उर्फ धनंजय रजाकार काळे (रा. चिंचोली रमजान) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमली भोसलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तिने काही महत्त्वाची माहिती दिल्याचे स्रोतांकडून समजते.










