अंधेरी पोटनिवडणूक : अखेर उद्धव ठाकरेंनी घेतलं राज ठाकरेंचं नाव, भाजपचे मानले आभार!
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतून भाजपनं माघार घेतली अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पण, भाजपनं माघार घेण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलं होतं. पहिले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मात्र उद्धव ठाकरेंनी फक्त पवारांचे आभार मानले. त्याची चर्चा […]
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतून भाजपनं माघार घेतली अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पण, भाजपनं माघार घेण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलं होतं. पहिले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मात्र उद्धव ठाकरेंनी फक्त पवारांचे आभार मानले. त्याची चर्चा झाली, पण आता ठाकरेंनी राज ठाकरेंचं नावही घेतलंय आणि भाजपचे आभारही मानलेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधी करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन सर्वपक्षीयांना केलं.
पवारांनी आवाहन केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनातून ठाकरेंनी फक्त शरद पवारांचेच आभार मानले आणि राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मात्र एका शब्दातही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे ठाकरेंच्या या निवेदनाची चर्चा झाली.
Andheri Bypoll : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या निर्णयाबाबत म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा…”