कल्याणमध्ये घराच्या बाल्कनीवरून वाद, दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण पश्चिमेतील बारावे येथे दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. यासंदर्भातला व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा वाद शेजाऱ्याच्या घराच्या बाल्कनीवरून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्यावेळी वाद झाला त्यावेळी हा वाद सीसीटिव्हीमध्ये कैद केला आहे. झालेल्या वादाची तक्रार कल्याण येथील खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. नेमकी चुकी कुणाची आहे ? किंवा वाद कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीमध्ये दोन कुटुंबियात बाल्कनीवरून वाद झाल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

व्हिडीओत सुरूवातीला एका घराच्या दरवाज्याजवळ दोन महिलांनी एका महिलेवरती हल्ला केला. त्यावेळी त्या घरातून एक लाल रंगाचा शर्ट घातलेला पुरूष देखील बाहेर आला आहे. परंतु एका महिलेला त्या महिला मारहाण करत रस्त्यावर खेचत आहेत. तसेच त्यावेळी अनेक महिला जमा होताना व्हिडीओत दिसत आहेत. महिला एकामेकींच्या केसाला पकडून मारहाण करीत आहेत. भांडण सुरू असताना एक कुत्रा त्यांच्याबाजूने गिरट्या घालत आहे. दोन महिलांनी एका महिलेला चक्क बॅटने मारहाण केली आहे. मारू दे…मारू दे…मी त्यांची आता बरोबर वाट लावतो असं एक पुरूष व्हिडीओत बोलत आहे…महिलेला रस्त्यात आडवी पाडून मारहाण केली आहे.

याबाबत खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. संबंधित तक्रारदाराने हा व्हिडीओ सुध्दा पोलिसांच्या दिला आहे. त्यामुळे नेमका वाद कशामुळे झाला. मारहाण केलेल्या महिला कोण होत्या. या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT