राज ठाकरेंना भाजपनं पत्र लिहायला सांगितलं?; अरविंद सावंतांचं मनसे अध्यक्षांच्या मौनावर बोट
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. उमेदवारी अर्ज दाखल झालेत आणि सर्वच उमेदवार प्रचारालाही लागलेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून निवडणूक लढवू नये अशी विनंती केलीये. राज ठाकरेंच्या याच पत्राबद्दल भूमिका मांडताना अरविंद सावंतांनी शंका उपस्थित केली आहे. राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले,”ती खरी महाराष्ट्राची संस्कृती […]
ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. उमेदवारी अर्ज दाखल झालेत आणि सर्वच उमेदवार प्रचारालाही लागलेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून निवडणूक लढवू नये अशी विनंती केलीये. राज ठाकरेंच्या याच पत्राबद्दल भूमिका मांडताना अरविंद सावंतांनी शंका उपस्थित केली आहे.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले,”ती खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण उशीर झालाय. देर आये दुरुस्त म्हणता येईल, पण ते त्यांच्या व्यर्थीपुरतं म्हणता येईल. प्रत्यक्षात काय घडलंय? निवडणूक आयोगाकडे जेव्हा शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचा वाद घातला, तेव्हा या शिंदे गटानं सांगितलं की, धनुष्यबाणाचा गैरवापर होईल म्हणून ते चिन्ह गोठवावं. आम्हाला द्यावं. नाव गोठवावं. लढले का निवडणूक? लढताहेत का निवडणूक? खोटेपणा तिथे केला. किती खोटारडी माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक नेत्याचं विधान खोटं असणार आणि होतं, त्याचं हे समोर दिसलेलं उदाहरण आहे.”
‘भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा, फडणवीसांना पत्र
“एव्हढं करून ते थांबलेत का? ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना जे गलिच्छ राजकारण खेळलं गेलं. जो दबाव मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) टाकला. कितीही त्यांनी सांगू द्या की आमचा दबाव नव्हता. मग माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं की, दबाव नव्हता तर मंजूर करण्याचे आदेश दिले नाही? तुमचा दबाव होताच होता. दुर्दैवाने अधिकारी गुलामासारखे वागले. मुंबई महापालिकेला त्यांनी कलंक लावला. लांच्छन लावलं”, अशा शब्दात अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केला.