Aryan Khan : शाहरुख खानचा मुलगा विकणार विदेशी मद्य, जगातील सर्वात मोठ्या कंपनीशी ‘डील’
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता विदेशी दारू विकणार आहे. व्यावसायिक जगतात एंट्री घेऊन त्याने जगातील सर्वात मोठी दारू कंपनी AB InBev या भारतीय युनिटशी करार केला आहे. ही कंपनी कोरोना सारख्या बिअर ब्रँडचे वितरण आणि विपणन करते. रिपोर्टनुसार, 25 वर्षीय आर्यन खानने त्याच्या व्यावसायिक भागीदारांसह भारतात प्रीमियम व्होडका ब्रँड लॉन्च करण्याची तयारी […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता विदेशी दारू विकणार आहे. व्यावसायिक जगतात एंट्री घेऊन त्याने जगातील सर्वात मोठी दारू कंपनी AB InBev या भारतीय युनिटशी करार केला आहे. ही कंपनी कोरोना सारख्या बिअर ब्रँडचे वितरण आणि विपणन करते. रिपोर्टनुसार, 25 वर्षीय आर्यन खानने त्याच्या व्यावसायिक भागीदारांसह भारतात प्रीमियम व्होडका ब्रँड लॉन्च करण्याची तयारी केली आहे. आर्यन खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरही याची घोषणा केली आहे. त्याने लॉन्च केलेल्या व्होडका ब्रँडचे नाव डी’यावॉल आहे. जो तो त्याचे भागीदार बंटी सिंग आणि लेटी ब्लागोएवासोबत लॉन्च करेल.
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून घोषणा
आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डी’यावॉलच्या लोगोसह फोटोही शेअर केले आहेत. त्याने दोन फोटो पोस्ट केले आहेत, एका फोटोमध्ये तो एकटा दिसत आहे, तर दुसऱ्यामध्ये तो त्याच्या पार्टनरसोबत दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘यासाठी जवळपास पाच वर्षे लागली आहेत. D’Yavol फायनली आला आहे…’ यूजर्स त्याच्या या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत.
‘स्लॅब व्हेंचर’ नावाची कंपनी स्थापन केली!
रिपोर्टनुसार, आर्यन खान, बंटी सिंग आणि लेटी ब्लागोएवा यांनी मिळून डी’यावॉल लॉन्च करण्यासाठी स्लॅब व्हेंचर नावाची कंपनी स्थापन केली आहे. ज्या अंतर्गत हा व्होडका ब्रँड लॉन्च केला जाणार आहे. त्याच्या वितरण आणि विपणनासाठी Anheuser-Busch InBev (AB InBev) च्या स्थानिक युनिटशी भागीदारी केली आहे.
हे वाचलं का?
आर्यन खानच्या माध्यमातून हा अल्ट्रा-प्रिमियम व्होडका ब्रँड Diavol (D’Yavol) लाँच केल्यानंतर व्यवसाय वाढवण्याची योजना आहे, ज्याची विक्री आणि वितरण फक्त AB InBev द्वारे केले जाईल. यानंतर, व्हिस्की आणि रम सारख्या तपकिरी स्पिरिट्स लाँच करण्याची त्यांची योजना आहे. ईटीच्या अहवालानुसार, या भागीदारीअंतर्गत आणखी अनेक उत्पादने बाजारात आणली जातील. यामध्ये आर्यन खानने सांगितले आहे की, 2018 मध्ये तो जर्मनीमध्ये त्याच्या व्यावसायिक भागीदारांना भेटला होता, तेव्हा याविषयी चर्चा सुरू झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT