आषाढी वारी 2021: पायी वारीसाठी वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर

ADVERTISEMENT

सोलापूर: आषाढी वारी (Ashadhi Ekadashi Wari 2021) पायीच करणार या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अर्ज दाखल केली असून याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी (Warkari) मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला. तो आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये ताबडतोब बदल करून पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा. या संदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सचिव ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला आहे.je

हे वाचलं का?

पाहा वारकऱ्यांची नेमकी मागणी काय:

महाराष्ट्रात वारीला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने पाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले.

ADVERTISEMENT

महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्तापर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते. शिवाय सध्या रुग्णसंख्या ही खूप कमी होत आहे.

ADVERTISEMENT

यंदाही पायी वारी नाहीच, देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी

आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी व लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय जाहीर करावा असे निवेदन कार्यालयाला पाठवले आहे.

‘कुंभमेळ्यात जे घडलं ते इथे घडू नये यासाठी प्रयत्न’

‘वारीची परंपरा ही वर्षानुवर्षे सुरु आहे त्यामुळे ती टिकलीच पाहिजे पण सोबत आपल्याला कोरोनाच्या सावटाचा विचार करायचा आहे.’ असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (12 जून) स्पष्ट केलं होतं.

‘विभागीय आयुक्तांच्या बैठकीत सर्व अधिकारी, वारकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्बंध शिथील केले आहेत.’

सरकारने वारीच्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता,खडसेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

‘वारीला गेल्यावर पायी चालत जाण्याची मूभा दिली आहे. परंतू कुंभमेळ्यानंतर कोरोनाचा जसा प्रसार झाला तसं इकडे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.’

‘वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आम्हाला आदर आहे परंतू राज्याच्या आरोग्य हिताकडे पाहणंही गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे योग्य तो विचार करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘पण तरीही काही वारकऱ्यांच्या मनात शंका असतील किंवा त्यांना काही भावना मांडायच्या असतील तर विभागीय आयुक्तांना त्यांच्या चर्चा करण्यास सांगू.’ अशी माहिती अजित पवारांनी दिली होती.

असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

  • पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल

  • इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक

  • काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही

  • रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी

  • प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT