भारतात Corona संकट गहिरं, ‘या’ देशाने दिला मदतीचा हात, पुरवणार Oxygen concentrator
भारतात कोरोनाचं संकट गहिरं होतं आहे. दुसऱ्या लाटेत इथली परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशात आता ऑस्ट्रेलियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे भारताला 100 Oxygen concentrators दिले जाणार आहेत. त्यासोबत टँक्सही दिले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात ही मदत दिली जाईल असंही ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आलं आहे. Australian Govt has agreed to commence procurement of […]
ADVERTISEMENT
भारतात कोरोनाचं संकट गहिरं होतं आहे. दुसऱ्या लाटेत इथली परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशात आता ऑस्ट्रेलियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे भारताला 100 Oxygen concentrators दिले जाणार आहेत. त्यासोबत टँक्सही दिले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात ही मदत दिली जाईल असंही ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Australian Govt has agreed to commence procurement of 100 oxygen concentrators, along with tanks and consumables. Department of Foreign Affairs & Trade will manage the movement of PPE and equipment over the next week: Govt of Australia
— ANI (@ANI) April 27, 2021
आणखी काय मदत करणार आहे ऑस्ट्रेलिया?
PPEs चं पॅकेज देण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारताला 10 लाख सर्जिकल मास्क दिले जाणार आहेत.
हे वाचलं का?
5 लाख N95 मास्क दिले जाणार आहेत
1 लाख सर्जिकल गाऊन्स
ADVERTISEMENT
1 लाख गॉगल्स
ADVERTISEMENT
1 लाख हँड ग्लोव्ह्जच्या पेअर्स
20 हजार फेस शिल्ड्स
या सगळ्याचा समावेश या पॅकेजमध्ये असणार आहे असंही ऑस्ट्रेलिया सरकारने स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलिया भारताला 500 Non invasive व्हेंटिलेटर्सही पुरवणार आहे.
भारतात दिवसभरात 3 लाख 23 हजार 144 नवे रूग्ण आढळले आहेत. 2771 मृत्यू झाले आहेत. तर 2 लाख 51 हजार 827 रूग्ण बरे झाले आहेत. आजवर भारतात 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 रूग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत देशात एकूण 1 लाख 97 हजार 894 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला देशात 28 लाख 82 हजार 204 सक्रिय रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात 14 कोटी 52 लाख 71 हजार 186 जणांचं लसीकरण झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT