उल्हासनगर : रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ३५ वर्षीय नराधम रिक्षा चालकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिपक हिवाळे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्यांच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीची ओळख काढून तिच्यासोबत आधी जवळीक निर्माण केली. यानंतर त्याने या मुलीला शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. गेल्या ६ महिन्यांपासून […]
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ३५ वर्षीय नराधम रिक्षा चालकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिपक हिवाळे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्यांच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीची ओळख काढून तिच्यासोबत आधी जवळीक निर्माण केली. यानंतर त्याने या मुलीला शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. गेल्या ६ महिन्यांपासून हा अत्याचार सुरु होता. पीडित मुलीच्या आई-वडीलांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास ६ वर्षांचा सश्रम कारावास
हे वाचलं का?
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करुन तुफान मारहाण, Video व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT