Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला
Bageshwar Baba controversy : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धीरेंद्र शास्त्री (dhirendra shastri) महाराज ऊर्फ बागेश्वर बाबाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांबद्दल संतापजनक विधान केलं आहे. (dhirendra shastri on tukaram maharaj) या विधानावरून महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले असून, आता मनसेनं (MNS) या वादात उडी घेतलीये. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीस आणि भाजप नेत्यांवर […]
ADVERTISEMENT

Bageshwar Baba controversy : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धीरेंद्र शास्त्री (dhirendra shastri) महाराज ऊर्फ बागेश्वर बाबाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांबद्दल संतापजनक विधान केलं आहे. (dhirendra shastri on tukaram maharaj) या विधानावरून महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले असून, आता मनसेनं (MNS) या वादात उडी घेतलीये. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीस आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. (bageshwar baba controversial statement on sant tukaram maharaj)
बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांबद्दल काय बरळले?
बागेश्वर बाबाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, “संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांनी याबद्दल विचारलं की, ‘तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?’ त्यावर तुकाराम महाराज त्या व्यक्तीला म्हणाले की, ‘मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.”
“त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, ‘अरे वा, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली”, असं बागेश्वर बाबा या व्हिडीओत त्यांच्या अनुयायांना सांगत आहे.
सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धिरेंद्र शास्त्री कोण आहेत?
मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी
संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबाने केलेल्या या संतापजनक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या विधानांचा निषेध करताना बागेश्वर बाबावर कारवाई करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केलीये.