अभिनेत्री कंगना रणौतविरोधात वॉरंट जारी

मुंबई तक

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या अब्रु नुकसानीचं प्रकरण अभिनेत्री कंगनाला भोवलंय. या प्रकरणादरम्यान कंगनाला आज दंडाधिकारी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौतवर अब्रु नुकसानीचा दावा केला होता. अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. यावेळी जावेद अख्तर यांच्याकडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या अब्रु नुकसानीचं प्रकरण अभिनेत्री कंगनाला भोवलंय. या प्रकरणादरम्यान कंगनाला आज दंडाधिकारी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौतवर अब्रु नुकसानीचा दावा केला होता.

अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. यावेळी जावेद अख्तर यांच्याकडून त्यांच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी पक्ष मांडला. सुनावणी दरम्यान कंगना राणौत आणि तिचे वकील उपस्थित नव्हते. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी केलेल्या सुनावणीत कंगनाला पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

हे वाचलं का?