कर्नाटकात पुन्हा तणाव! बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या; दगडफेक, जाळपोळीचा भडका
हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटकातील तापलेलं वातावरण शांत होत असल्याचं दिसत असतानाच पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला आहे. कर्नाटकातील शिवमोगामध्ये एका २३ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर शिवमोगात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. हिंसेचा भडका उडाल्यानं शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हिजाबमुळे परिस्थिती तणावपूर्ण […]
ADVERTISEMENT
हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटकातील तापलेलं वातावरण शांत होत असल्याचं दिसत असतानाच पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला आहे. कर्नाटकातील शिवमोगामध्ये एका २३ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर शिवमोगात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. हिंसेचा भडका उडाल्यानं शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
हिजाबमुळे परिस्थिती तणावपूर्ण असतानाच कर्नाटकातील शिवमोगामध्ये एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हर्षा असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (२० फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. शहरातील भारती कॉलनीमध्ये काही अज्ञात लोकांनी बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या हर्षावर चाकू हल्ला केला.
हे वाचलं का?
या प्राणघातक हल्ल्यात हर्षा गंभीर जखमी झाला. त्याला काही जणांनी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. हत्येचं वृत्त परिसरात आणि शहरात पसरल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
घटनेच्या काही तासानंतर शिवमोगातील सिगेहट्टी परिसरात काही लोकांच्या जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. त्याचबरोबर भडकलेल्या जमावाने अनेक वाहनं पेटवून देत जाळपोळ केली. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
कर्नाटकातील राजकीय नेत्यांमध्ये कशावरून पेटलाय वाद?
हिजाबचा मुद्दा पेटलेला असताना शिवमोगा चर्चेत राहिल आहे. हिजाबच्या मुद्द्यावर बजरंग दलही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळे आता हत्येनंतर राजकारणही तापलं आहे. या हत्येचा हिजाब वादाशी संबंध जोडला जात आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजपसह काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. मागील आठवड्यात हिजाबवरून वाद सुरू झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती मी आधीच व्यक्त केली होती. आता एका मुलाने जीव गमावला आहे. राज्यातील शांतता भंग करणारे काँग्रेस आणि भाजप आता आनंदी असेल, अशी टीका कुमार स्वामी यांनी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईनेही या प्रकरणाबद्दल ट्वीट केलं आहे. ‘शिवमोगामध्ये हिंदू कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे दुःखी झालो आहे. तपास सुरू आहे आणि दोषींना लवकरच अटक केली जाईल. शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश पोलिसांना दिले गेले आहेत. लोकांनीही शांतता पाळावी,” बोम्मई म्हणाले आहेत.
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर कर्नाटक सरकारमधील मंत्री ईश्वरप्पा आणि काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांच्या शाब्दिक चकमक होताना झडली. “ईश्वरप्पा मुर्ख माणूस आहे. ते निरर्थक गोष्टी बोलत असतात. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि भाजपचं सरकार बरखास्त केलं पाहिजे. त्यांना देशातील कुणीही माफ करू शकत नाही,” अशी टीका शिवकुमार यांनी केली होती.
त्याला उत्तर देताना ईश्वरप्पा यांनी शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. “तिरंगा हटवून भगवा फडकावला गेला, असं शिवकुमार यांनी धर्मियांना भडकावलं होतं”, असं ईश्वरप्पा यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री काय म्हणाले?
या हत्येचा संबंध हिजाब वादाशी जोडला जात असून, यावर कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जननेंद्र यांनी निवेदन केलं आहे. हत्या रविवारी साडेनऊ वाजता मुख्य रस्त्यावर घडली. आमच्याकडे काही पुरावे आहेत. या घटनेत चार ते पाच युवक सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांना आम्ही लवकरच अटक करू. शिवमोगातील लोकांनी शांतता पाळण्याची गरज आहे. हत्येचं अद्याप कळलेलं नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार यामागे हिजाबचा मुद्दा नाही. शिवमोगामध्ये पोलीस दलाबरोबरच आरएएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. २३ फेब्रूवारीपर्यंत कलम १४४ लागू असेल,” कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT