‘अमित शाहांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही’; बसवराज बोम्मईंच्या ‘ट्विट’ने वाद वाढणार!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (10 डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही, असं म्हटल्यानं सीमावाद पुन्हा वाढण्याचीच शक्यता निर्माण झालीये. कर्नाटकचे मुख्यंमत्री बसवराज बोम्मई यांनी थेट महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. गेल्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (10 डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही, असं म्हटल्यानं सीमावाद पुन्हा वाढण्याचीच शक्यता निर्माण झालीये.
कर्नाटकचे मुख्यंमत्री बसवराज बोम्मई यांनी थेट महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. गेल्या आठवडाभरापासून यामुळे सीमाभागात तणाव निर्माण झालेला असून, महाराष्ट्रभरही याचे पडसाद उमटले आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाकडे महाराष्ट्रातल्या खासदारांनी लोकसभेत सगळ्यांचं लक्ष वेधलं. तसेच महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केलीये. महाराष्ट्रातल्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एक ट्विट करत एक प्रकारे चिथावणीच दिलीये.
धैर्यशील माने, श्रीरंग बारणेंना फिरावं लागलं माघारी, अमित शाहांच्या दालनाबाहेरच ‘ड्रामा’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : बसवराज बोम्मई यांनी काय केलं ट्विट?
महाराष्ट्रातल्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर बसवराज बोम्मईंनी ट्विट केलंय. यात बोम्मई म्हणताहेत, “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही”, असं बोम्मईंनी म्हटलं आहे.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं काम केलंय पठ्ठ्यांनी, कर्नाटकला ‘असा’ शिकवलाय धडा!
बसवराज बोम्मई पुढे म्हणतात, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी भेट घ्यावी, असं कर्नाटकातील खासदारांना सांगितलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी सुद्धा लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे”, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत करीत असलेली वक्तव्ये व त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेवर सुरु झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी आमची भूमिका शांतपणे ऐकून घेतली. ही बैठक अतिशय सकारात्मक झाली”, असं सुप्रिया सुळे यांनी भेटीनंतर म्हटलं होतं.