Nawab Malik: ‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेआधी नवाब मलिकांचं ट्वीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: दिवाळी संपल्यानंतर आपण नवाब मलिकांविरोधात बॉम्ब फोडू असा दावा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानुसार आज (9 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे यावेळी देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे याच पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. पण या सगळ्या आधी नवाब मलिक यांनी सकाळीच एक सूचक ट्विट केलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा नवाब मलिक यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे.

‘ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें

हे वाचलं का?

मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते!’

असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. याचा अर्थ असा आहे की, ‘माझी बोलती बंद केली तरीही माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही बंद करु शकत नाही.’ असं या उर्दू शायरीचा नेमका अर्थ होता. नवाब मलिक यांच्या या शायरीचा नेमका गर्भित अर्थ काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यापासून नवाब मलिक हे सतत पत्रकार परिषद महिनाभरापासून पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि एनसीबी खोट्या कारवाया करत असल्याचा आरोप ते करत आले आहेत. यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या झडतच राहिल्या.

ADVERTISEMENT

यावेळी नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यावेळी नवाब मलिक यांनी असं म्हटलं होतं की, महाराष्ट्रात ड्रग्सचा सगळा खेळ जो काही सुरु आहे त्यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हे आहेत. नवाब मलिकांच्या याच आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की, ‘दिवाळीच्या सुरुवातीला नवाब मलिकांनी लवंगी लावला. पण दिवाळी संपल्यानंतर मी बॉम्ब फोडणार आहे.’

क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटणार

समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. नवाब मलिक यांनी जे आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहेत.

नवाब मलिक हे नाहक आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत हे क्रांती रेडकर यांनी वारंवार सांगितलं आहे. इतकंच नाही तर आपण धर्म बदललेला नाही हे ज्ञानेश्वर वानखेडेंनी सगळी कागदपत्रं दाखवूनही सांगितलं आहे. तरीही नवाब मलिक यांनी आरोप थांबवले नाहीत म्हणून ही भेट घेतली जाणार आहे असं समजतं आहे.

Drugs Case : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची 10 तास कसून चौकशी

नवाब मलिकांनी काय केले होते आरोप?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टी प्रकरण समोर आल्यापासून आणि आर्यन खानला अटक केल्यापासून ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असा आरोप केला आहे. तसंच समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत असंही त्यांनी वारंवार सांगितलं 2007 मध्ये त्यांनी एका मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. नंतर त्यांनी तलाक घेतला.

तसंच त्यांनी समीर वानखेडे यांचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असाच केला होता. यानंतर पत्रकार परिषद घेऊन क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडले होते. आता आज याच प्रकरणी क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT