Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

मुंबई तक

Ramesh Bais new Governor of maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. कोश्यारी यांना पदमुक्त केल्यानंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Ramesh Bais new Governor of maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. कोश्यारी यांना पदमुक्त केल्यानंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. (President of India accepted the resignations of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायम वादातच का अडकतात? वाचा सविस्तर

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर “कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असं विधान त्यांनी केलं होतं.

राज्यपालांकडून केल्या गेलेल्या विधानांवरून महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात मोर्चाही काढला होता. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती आणि सातत्यानं विरोधकांकडून ही मागणी केली जात होती.

हे वाचलं का?