फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, भाई जगताप यांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फडणवीसजी मी तुम्हाला मुंबई मेट्रोची सफर घडवतो, भाई जगतापांचा टोलादेवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या मेट्रोत बसण्याची गरजच काय होती? त्यांनी महाराष्ट्रात यावं. मी त्यांना मुंबई मेट्रोची सफर घडवतो असा टोला काँग्रेस नेते भाई जगताप यांनी लगावला आहे. वर्सोवा घाटकोपर ही मेट्रोही तुम्ही सुरु केलेली नाही. महाराष्ट्रात मेट्रो रेल्वेचं जाळं पसरवायचं ही काँग्रेसची योजना होती. तुमच्याकडे जेव्हा सत्ता आली तेव्हा तुम्ही काय केलंत? महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला आजमावून पाहिलं आता दिल्लीश्वरांची खुशामत करण्याचे प्रयत्न सोडा. महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना खुश करण्यासाठी बीकेसीमधलं फायनान्स सेंटर गुजरातला पाठवलं. पाच वर्षे त्यांच्या हाती सत्ता होती. त्या काळात तुम्ही राज्याचं वाटोळं केलं.. पण आता महाराष्ट्र पुन्हा उभारी घेतो आहे. पुन्हा उभा राहतो आणि आणखी प्रगती करणार आहे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही असंही भाई जगताप यांनी सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

9 टप्प्यांमध्ये मुंबईत मेट्रोचं जाळं असेल हे काँग्रेसने जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं राजकारण अत्यंत घाणेरडं आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं नुकसान कसं होईल हेच तुमचं पाच वर्षाच्या काळातलं लक्ष्य होतं. त्यामुळे तुम्ही आम्हाला काहीही शिकवण्याची गरज नाही असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत भाई जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यासंदर्भातला व्हिडीओही त्यांनी ट्विट केला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी दिल्लीच्या मेट्रोची सफर केली आणि त्याबद्दलच एक वक्तव्य केलं होतं. “मी आज दिल्लीतल्या मेट्रोमध्ये बसलो. त्यानंतर अत्यंत कमी वेळात दिल्लीच्या विमानतळावरही पोहचलो. हेच चित्र मुंबईत कधी पाहण्यास मिळेल असा प्रश्न मला पडला आहे. कारण मुंबई मेट्रो 3 कारशेडच्या मुद्द्यावरुन रखडली आहे. पुढची चार वर्षे तरी मुंबईकरांना मेट्रो 3 मिळू शकणार नाही. ” असा आरो देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपावरुऩ आता भाई जगताप यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तसंच महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असंही भाई जगताप यांनी सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT