कट्टर समर्थकाचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; पण वसंत मोरेंकडून राज ठाकरेंना मोठं गिफ्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यात वातावरण तापले होते. पक्षातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला. आता काल पुण्यात पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पुणे मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आणि मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

ADVERTISEMENT

वसंत मोरे यांनीही पुण्यातील मनसे नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु असतानाच मोरेंनी सर्वांना धक्का दिला आहे. येत्या 14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्याचं मोठं नियोजन वसंत मोरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या वाढदिवसाला वसंत मोरेंकडून हे मोठं गिफ्ट असणार आहे.

येत्या 12 तारखेला वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमीत्त साधत पुण्यात रोजगार मेळावा ठेवला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 56, 57 आणि 58 क्रमांकातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान पुण्यातील मनसे नेते आणि वसंत मोरे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे.

हे वाचलं का?

वसंत मोरेंना अनेक पक्षांकडून खुली ऑफर देखील देण्यात आली होती परंतु मी राजसाहेबांचाच म्हणत वसंत मोरेंनी सर्व ऑफर नाकारल्या. पुण्यातील अनेक कार्यक्रमात वसंत मोरेंना डावलले जात आहे त्यामुळे वसंत मोरेंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना पक्षातून बाजूला करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मनसेमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. पुण्यातील मनसेचे निलेश माझीरे यांनी पुण्यातील दोन नेत्यांवर आरोप करत पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. निलेश माझीरे यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना नेते सचिन अहिर यांचीही भेट घेतली होती त्यामुळे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माझीरेंनी पक्ष सोडला असला तरी ते कोणत्या पक्षात जाणार हे अजून त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT