RSS मध्ये मोठा फेरबदल, भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळेंची सरकार्यवाह पदी निवड
बंगळुरु: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) आज (20 मार्च) एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आरएसएसच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैय्याजी जोशी यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकार्यवाह हे संघातील दुसऱ्या […]
ADVERTISEMENT

बंगळुरु: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) आज (20 मार्च) एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आरएसएसच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैय्याजी जोशी यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.
बंगळुरुमध्ये आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकार्यवाह हे संघातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. ज्यासाठी आज सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्याऐवजी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली. 2009 पासून दत्तात्रेय होसबळे यांच्याकडे सह सरकार्यवाह जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरएसएसमध्ये सरकार्यवाह हे अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं. दरम्यान, या फेरबदलामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरएसएसमध्ये दर 3 वर्षांनी कार्यकारिणीची निवड केली जाते. यावेळी सरकार्यवाहपासून खालच्या कार्यकारिणीची निवड केली जाते. यावेळी फक्त सरसंघचालक पदासाठी निवड केली जात नाही. बंगळुरुत सुरु असलेल्या निवड प्रक्रियेत आज होसबळे यांची सरकार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
बेंगलुरु : संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा में सरकार्यवाह पद के लिए श्री दत्तात्रेय होसबाले जी निर्वाचित हुए। वे 2009 से सह सरकार्यवाह का दायित्व निर्वहन कर रहे थे। pic.twitter.com/wEVwGCDaWD
— RSS (@RSSorg) March 20, 2021
फडणवीस भल्या सकाळी RSS मुख्यालयात भागवतांच्या भेटीला; चर्चाना उधाण
