वाझेंच्या सोसायटी CCTVबाबत मोठा खुलासा, ‘मुंबई तक’च्या हाती पत्र

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अँटेलियाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारसंदर्भात दररोज नवनवीन अतिशय धक्कादायक असे खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे वाझे यांच्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर हे त्यांच्याच टीममधील अधिकाऱ्यांनी नेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेज डिलीट तर करण्यात आलेलं नाही ना? असा NIA ला संशय आहे.

ADVERTISEMENT

जाणून घ्या अँटेलिया प्रकरणातील अगदी महत्त्वाचं आणि वाझेंना अडचणीत आणणाऱ्या प्रचंड धक्कादायक गोष्टीचा खुलासा…

25 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाजवळ संशयित स्कॉर्पिओ कार आढळली होती. ज्यामध्ये जिलेटीन कांड्या सापडल्या होत्या. याचा तपास तात्काळ मुंबई क्राईम ब्रांचच्या CIU ने म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटने सुरु केला होता.

हे वाचलं का?

NIAच्या चौकशीला जाताना सचिन वाझेंनी का नेला नव्हता मोबाईल?

याच पार्श्वभूमीवर दोनच दिवसांनी 27 फेब्रुवारीला CIU युनिटचे प्रमुख सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्स इमारतीतील CCTV फुटेज डीव्हीआर सहित पोलिसांनी. धक्कादायक म्हणजे सचिन वाझे यांच्या CIU टीमनेच हे CCTV फुटेज नेल्याचं उघड झालं आहे.

ADVERTISEMENT

CCTV फुटेज ताब्यात घेण्याआधी सीआयूचे अधिकारी रियाझुद्दीन काझी यांनी वाझे राहत असलेल्या सोसायटीला एक पत्र दिलं होतं. ज्या पत्रात असं म्हटलं होतं की, ‘EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व सिसिटिव्हि कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे आहे.’

ADVERTISEMENT

वाझे प्रकरणी राणेंनी सनसनाटी आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

यामुळे आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे अँटेलियाबाहेर स्कॉर्पिओप्रकरणी सचिन वाझे यांच्या सोसायटीचं CCTV फुटेज का घेण्यात आलं? यावरुनच NIA चा संशय बळावला आहे की, हे फुटेज डिलीट झालं असण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेज वाझेंच्याच टीमने (CIU) का नेलं असावं?

NIA कडून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, अँटेलियाबाहेर असलेली स्कॉर्पिओ कार ही चोरी झाली नसून ती विक्रोळी येथून थेट वाझे राहत असलेल्या इमारतीत नेण्यात आली असावी.

तिथे ही कार बरेच दिवस होती आणि नंतर 25 फेब्रुवारीला ती कार अँटेलिया येथे पार्क करण्यात आली असावी. या सगळ्या दरम्यान ही स्कॉर्पिओ कार वाझेंच्या सोसायटीमधील अनेक सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असणार आणि हेच उजेडात येऊ नये म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज सीआययूने ताब्यात घेतलं असावं.

वाझेंच्या सोसायटीमधील CCTV फुटेज त्यांच्याच टीमने कसं मिळवलं? जाणून घ्या याबाबतची नेमकी घटना

सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलिस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले हे सुरुवातीला साकेत सोसायटी येथे पोहचले.

तेव्हा त्यांनी तपासाकामी सोसायटीतील CCTV फुटेज पाहिजे असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितलं. पण याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही असं काहीच करु शकत नाही. असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारं एक पत्र सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं होतं.

पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं:

‘सेक्शन 41 CRPC कलमानुसार आम्ही साकेत सोसायटीला ही नोटीस देतोय की, मुंबई क्राईम ब्रांच CIU DCB CID MUMBAI यांनी रजिस्टर केलेल्या क्राइम रजिस्टर 40/21 गुन्ह्यानुसार कलम 286, 465, 473, IPC 120 (B), INDIAN EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांत तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे. त्यानुसार आपल्या इमारतीतील 2 DVR हे आम्हास घेऊन जायचे आहेत. या नोटीसीनुसार आम्ही आपल्याला CCTV फुटेज द्यायचे आदेश देत आहोत.’ असं या पत्रात म्हटलं आहे.

या पत्राच्या शेवटी CIU DCB CID युनिटचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर CCTV फुटेज जप्त करुन नेले.

सीसीटीव्ही फुटेजसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न

1. आता प्रश्न हा उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्याच घरचे CCTV फुटेज या CIU टीमने का जप्त केले?

2. CCTV फुटेज कोणाच्या सांगण्यावरून CIU टीमने घेतलं ताब्यात?

3. या CCTV फुटेजचं नेमकं काय करण्यात आलं?

4. हा सर्व प्रकार सचिन वाझे यांच्यासह त्यांचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त तसेच पोलीस सह आयुक्त यांना माहिती होता का?

असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. दरम्यान, आता सोसायटीचं पत्र हाती आल्याने वाझेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

दरम्यान, CIU पाठोपाठ महाराष्ट्र दहशतवादी विरोधी (ATS) पथक देखील वाझेंच्या सोसायटीच्या CCTV फुटेज संदर्भात चौकशी करण्यासाठी १४ मार्चला आलं होतं. मात्र CIU टीमने ते फुटेज आधीच नेलं असल्याने एटीएस पथकाच्या हाती काहीच लागलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT