Pune : “तुमचं तिकीट फिक्स झालयं, 76 हजार पाठवा”; कुणाल टिळक यांना फोन
Kasba by-election and BJP: पुणे : पुण्यातील (Pune) कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (chinchwad) या दोन विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात पोटनिवडणूक (By Poll) होत आहे. याच निवडणुकीमुळे सध्या प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (bjp took a […]
ADVERTISEMENT
Kasba by-election and BJP:
ADVERTISEMENT
पुणे : पुण्यातील (Pune) कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (chinchwad) या दोन विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात पोटनिवडणूक (By Poll) होत आहे. याच निवडणुकीमुळे सध्या प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (bjp took a big decision regarding kasba by election sent names of 5 candidates to central election committee)
अशातच तुमचं तिकीट फिक्स झालं आहे. ७६ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करा. असा कॉल मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘मुंबई तक’ने कुणाल टिळकच्या वडिलांशी संवाद साधला असता शैलेश टिळक यांनी दुजोरा दिला की असा कॉल आला होता. पुढे म्हणाले की, अशा घटना हल्ली घडत असतात. पाच दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास एक कॉल आला होता.
हे वाचलं का?
‘दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा’ : हे शब्द राज्यगीतामधून वगळले का?
कॉल करणारी व्यक्ती म्हणाली की, कसबा विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं तिकीट फिक्स झालं आहे. ह्यासाठी तुम्ही ७६ हजार रुपये तातडीने ट्रान्सफर करा. त्यानंतर त्या नंबरची चौकशी केल्यावर हा फेक कॉल असल्याचे समोर आलं. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली असून संबधित व्यक्तीचा तपास सुरू असल्याचं या वेळी कुणाल टिळक सांगितले.
ADVERTISEMENT
कोणाचं तिकिट होणार फायनलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भाजपने केंद्रीय निवड समितीला 5 नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक या दोन नावांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचीही नावे निवड समितीला देण्यात आली आहेत. या तीन दिवसात भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून निश्चित उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
Sambhaji Bhide: ‘समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका’
मुक्ता टिळक यांच्या निधनाला केवळ तीन आठवडे झालेले असताना निवडणुक आयोगाकडून कसब्याची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच भाजपसह सर्वच पक्षांना पडला आहे. भाजपकडून माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे त्याचबरोबर गणेश बीडकर हे इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातूनच या जागेवर दावा सांगण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT