Chandrakant Patil : महापुरुषांच्या विधानावर खुलासा; म्हणाले, “शेंडा नाही बुडखा नाही…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांकडं भीक मागितली आणि शाळा सुरु केल्या, या विधाननंतर ते आता टीकेचे धनी झाले आहेत.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांनी खुलासा :

दरम्यान, याच विधानावर आता चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला. ते म्हणाले,

मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी काय म्हटलं, हे मी सांगण्यापेक्षा दर्शकांनी लाईव्ह पाहिलं आहे. त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला. शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरु केल्या, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरु केल्या. त्या शाळा सुरू करताना ते सरकारी अनुदान अवलंबून नाही राहिले, त्यांनी लोकांकडे भीक मागितली.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात; महापुरुषांवरील वक्तव्यानंतर विरोधकांनी घेरलं

आता भीक म्हणजे काय? आताच्या भाषेत सीएसआर म्हणू, वर्गणी म्हणू, देणग्या म्हणू. आपण साधारणतः म्हणतो किंवा दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली. त्यामुळे माझी क्लिप पूर्ण ऐकली तर मग आणखी ही मी खूप मांडलं आहे. आज जे पैठणला त्याची सगळ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड वाह वा झाली.

ADVERTISEMENT

त्याच्यामध्ये मी असं मांडलं की जर आपल्याला संत विद्यापीठ सुरू करायचं असेल तर सरकार मदत करेल. पण सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहतात? खूप समाजामध्ये लोक देणार आहेत. त्यावेळेला मी हे वाक्य जोडलं. शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरु केल्या, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरु केल्या.

ADVERTISEMENT

त्यांना सरकार अनुदान देतोय म्हणून त्यांनी सुरु नाही केल्या. वेळप्रसंगी त्यांनी लोकांमुळे भीक मागितली आणि त्यावेळी मी तो माझा गमछा पुढे केला. त्यावेळी दहा रुपयेही लोकं द्यायचे. त्यावर त्यांनी संस्था चालवल्या. आता या प्रत्येक गोष्टीला, असा शेंडा नाही बुडखा नाही म्हणून वाद निर्माण करण्याचं जे चाललंय ना तर त्याचा जे कोणी ही क्लिप पाहतात, ऐकतात ते लगेच म्हणतात की काय चाललंय? अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.

पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे ते म्हणाले, आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, हेही त्यांनी नमूद केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT