विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 […]
ADVERTISEMENT

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती
भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी नितीन तेलवणे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४-अ, ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bjp corporator from murbad in thane district arrested for allegedly molesting woman)
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड येथील भाजपचा नगरसेवक नितीन तेलवाने याने काल रात्री १२.४० च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी आज त्याला अटक करण्यात आली.त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४-अ,५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pic.twitter.com/KPmTBmajRw
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 4, 2021
जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी काय म्हणाले गृहमंत्री










