बंगालमध्ये भाजपचा पराभव, पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्या शब्दात केला भाजपवर हल्लाबोल
मुंबई: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज (2 मे) जाहीर झाले आहेत. यावेळी सगळ्यांचं लक्ष हे प. बंगालच्या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. कारण प. बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने प्रचंड ताकद पणाला लावली होती. मात्र, या सगळ्याला एकट्या ममता बॅनर्जी यांनी सक्षमपणे तोंड देत एकहाती प्रचंड विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयाचं आता देशभरातून कौतुक होत आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबई: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज (2 मे) जाहीर झाले आहेत. यावेळी सगळ्यांचं लक्ष हे प. बंगालच्या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. कारण प. बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने प्रचंड ताकद पणाला लावली होती. मात्र, या सगळ्याला एकट्या ममता बॅनर्जी यांनी सक्षमपणे तोंड देत एकहाती प्रचंड विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयाचं आता देशभरातून कौतुक होत आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ममतादीदींचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांना बंगाली वाघीण असून त्यांनी जनतेच्या स्वाभिमानाचा एकाकीपणे लढा दिला. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले
हे वाचलं का?
‘ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
बंगालमधील पराभवामुळे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’ला ब्रेक?
ADVERTISEMENT
प. बंगालमधील मोठ्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. प. बंगालमध्ये भाजप मोठा विजय मिळवू असं स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता की, जर बंगालमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं तर त्याचे पडसाद हे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात उमटू शकतात.
कारण महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या भाजपला सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. पण जर प. बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवली असती तर महाराष्ट्रात ‘ऑपेरशन लोट्स’ने नक्कीच जोर धरला असताना असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पण आता बंगालमधील पराभवानंतर महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसला काही प्रमाणात ब्रेक लागलाय एवढं निश्चित.
पाच राज्यांतील निवडणुकीपैकी सगळ्यात सर्वात चर्चेत राहिलेलं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. कारण बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने गेल्या 5 वर्षापासून प्रचंड तयारी केली होती. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी देखील आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद झोकली होतं. त्यामुळे आज अवघ्या देशाचं लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागून राहिलं होतं.
ममता दीदींनी जवळजवळ सर्व एक्झिट पोलचे अंदाज ठरवले चुकीचे:
अनेक एक्झिट पोल्समध्ये असा अंदाज वर्तवण्यात येत होता की, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळेल. पण हे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे सगळे अंदाज चुकीचे ठरवले. एवढंच नव्हे तर त्यांच्या पक्षाने चक्क डबल सेंच्युरी केली आहे. तसंच भाजपला 100 च्या आत रोखण्याची किमया देखील त्यांनी करुन दाखवली आहे.
2016 च्या तुलनेत भाजपला इथे मताधिक्यात मात्र बराच फायदा झाला असल्याचं दिसून येत आहे. 2016 मध्ये भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या, आणि व्होट शेअर 10 टक्के होतं. मात्र यावेळी भाजपला बऱ्याच प्रमाणात मतदान झालं असून त्यांच्या जागाही वाढल्या आहेत. जवळपास 75 हून अधिक जागांवर इथे भाजपला विजय मिळत असल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT