अजितदादा तुम्ही मांडीला मांडी लावून सरकार आणलेलं, सांभाळून बोला.. मी फाटका आहे, तुम्हाला महागात पडेल: चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawart) यांच्यात मागील काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करणं सुरुच आहे. मात्र आज (30 मे) चंद्रकांत पाटील हे अजित पवारांवर चांगलेच संतापले असल्याचं दिसून आलं. ‘तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे सांभाळून बोला, आम्ही फाटकेच आहोत… बोलायला लागलो तर खूप […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawart) यांच्यात मागील काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करणं सुरुच आहे. मात्र आज (30 मे) चंद्रकांत पाटील हे अजित पवारांवर चांगलेच संतापले असल्याचं दिसून आलं. ‘तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे सांभाळून बोला, आम्ही फाटकेच आहोत… बोलायला लागलो तर खूप महागात पडेल.’ अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT
दरम्यान, चंद्रकांत पाटील नेमके का संतापले हे आम्ही आपल्याला सांगणार आहोतच मात्र त्याआधी जाणून घेऊयात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले:
…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील ! चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
हे वाचलं का?
‘अजितदादा झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं… पवार साहेब सुद्धा झोपेतून उठायचे होते. तोपर्यत तुम्ही शपथविधी करुन मोकळे झालात. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं हे तुम्हाला माहिती. मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की, अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असणारे नेते यांना आपण काल काय केलंय याची आठवण असेल. पण बहुदा त्यांना काल काय केलं याची आठवण नाही.’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील पुढे असंही म्हणाले की, ‘ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसासाठी का होईना सरकार स्थापन केलं त्यांच्यावर टीका करताना काही तरी तर विचार करा. हे सरकार काय तुम्हाला तलवार लावून आणून तयार केलं का फडणवीसांनी? सोच समझ के किया ना… तुम्हाला तुमचे २८ आमदार बरोबर ठेवता आले नाहीत. सगळे पवारांबरोबर पळून गेले आणि तरीही तुम्ही त्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री. आता माहीत नाही उद्या कोणतं सरकार येईल तिथे तुम्ही असला. म्हणजेच तुम्ही सगळीकडे पाहिजे.
ADVERTISEMENT
‘तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. केवळ तत्व ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार. अजितदादा जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत. आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल.’ अशा बोचऱ्या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. (BJP leader Chandrakant Patil got angry with Deputy Chief Minister Ajit Pawar)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याचा राजीनामा होईल-चंद्रकांत पाटील
अजित पवारांच्या कोणत्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील एवढे संतापले?
‘सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारही नाही कधी गेलं,’ असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना केलेलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार असं म्हणाले होते की, ‘सरकार जाणार हे चंद्रकांत पाटील यांनी जागं असताना केलं की, झोपेत केलं? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून भाजपा नेत्यांना असह्य झालं आहे. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत असातत.’ असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी केलं होतं. ज्यानंतर याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील प्रचंड संतापलेले दिसून आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT