राष्ट्रवादीची मतं रात्रीत फिरली; नगर जिल्हा बँकेवर भाजपचे कर्डिले अध्यक्ष
अहमदनगर : आशियातील पहिली सहकारी बॅक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे (BJP) माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Rao Kardile) यांची निवड झाली आहे. बँकेवर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) बहुमत असतानाही भाजपचा अध्यक्ष विजयी झाल्याने हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. (BJP Leader Shivaji Rao Kardile […]
ADVERTISEMENT
अहमदनगर : आशियातील पहिली सहकारी बॅक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे (BJP) माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Rao Kardile) यांची निवड झाली आहे. बँकेवर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) बहुमत असतानाही भाजपचा अध्यक्ष विजयी झाल्याने हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. (BJP Leader Shivaji Rao Kardile elected as Ahmednagar DCC Bank Chairman)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीची ४ मते भाजपच्या गोटात :
अहमदनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे आजारपणामुळे निधन झाल्याने अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. २१ संचालक असलेल्या बँकेत राष्ट्रवादीचे ११ संचालक होते. मात्र उदय शेळके यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीकडे १० शिल्लक राहिली. पण ऐन मतदानादिवशी मोठं राजकारण पाहायला मिळालं.
मतदानात राष्ट्रवादीची ४ मत भाजपच्या बाजूने गेली तर एक मत बाद झालं. त्यामुळे शिवाजीराव कर्डीले यांना १० मतं पडली. तर काँग्रेसची ४ आणि राष्ट्रवादीची ५ अशी ९ मतं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना मिळाली. अत्यंत नाट्यमय झालेल्या या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजयी झाला.
हे वाचलं का?
Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?
दरम्यान, राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळेच चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे मंगळवारी नगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नवीन अध्यक्ष निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडाळाशी चर्चा केली होती. त्यानंतर चंद्रशेखर घुलेंनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. मात्र, शेवटच्या क्षणी शिवाजी कर्डिले यांनी अर्ज भरत विजय मिळविला.
ADVERTISEMENT
Maharashtra budget Session Live: अजित पवारांच्या कार्यालयात मविआची बैठक
ADVERTISEMENT
फडणवीसांनी फिरवली सुत्र :
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीत फडणवीसांनी जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात येण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढलो आणि निवडूनही आलो, असं म्हणतं शिवाजीराव कर्डिले यांनी फडणवीस यांना या विजयाचं श्रेय दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT