शिरुर जिंकायला निघालेल्या भाजपचा ग्रामपंचायत निकालात सुपडासाफ : 61 पैकी केवळ 5 ठिकाणी यश
पुणे : यापुढचा खासदार काम करणारा असावा आणि भाजपचा असावा असे म्हणतं केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी 2024 साठी शिरुर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला आहे. त्या नुकत्याच भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना’ अंतर्गत 3 दिवसीय शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आता दिवस बदलले आहेत असे सांगून भाजप इथून ताकद […]
ADVERTISEMENT

पुणे : यापुढचा खासदार काम करणारा असावा आणि भाजपचा असावा असे म्हणतं केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी 2024 साठी शिरुर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला आहे. त्या नुकत्याच भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना’ अंतर्गत 3 दिवसीय शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आता दिवस बदलले आहेत असे सांगून भाजप इथून ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र शिरुर जिंकायला निघालेल्या याच भाजपचा पुणे जिल्ह्यातील आणि त्यातही शिरुर लोकसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत अक्षरशः सुपडासाफ झाला आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण 61 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यातील 6 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 55 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. आज जाहीर झालेल्या अंतिम निकालानंतर 61 पैकी केवळ 5 ग्रामपंचायतींवर भाजपला यश मिळाले आहे. तर उर्वरित बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी आणि काही अंशी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला यश मिळाले आहे.
सर्वाधिक ग्रामपंचायती शिरुर लोकसभा मतदारसंघातील :
निवडणूक जाहीर झालेल्या 61 ग्रामपंचायतींपैकी जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक 36 ग्रामपंचायती, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 5 आणि भोर तालुक्यांतील 2 ग्रामपंचायतींचा समावेश होता. यात भोर वगळता जुन्नर, खेड आणि आंबेगाव हे विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात येतात. मात्र याठिकाणी भाजपला अत्यंत मर्यादित यश मिळाले आहे. भाजपला जुन्नर तालुक्यातील 4 आणि आंबेगाव तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले आहे.